प्रश्नमंजुषा -235


सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त

1. दिपीका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे ह्या महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

A. बॅडमिंटन
B. बुद्धीबळ
C. महिला क्रिकेट
D. कबड्डी


Click for answer 
D. कबड्डी

2.रमेश भेंडीगिरी हे कब्बडीचे प्रशिक्षण कोणत्या स्पर्धेनंतर विशेष प्रकाशझोतात आले ?

A. पहिला पुरुष कबड्डी विश्वचषक
B. पहिला पुरुष कबड्डी आशीया चषक
C. पहिला महिला कबड्डी विश्वचषक
D. पहिला महिला आंतरराज्य कबड्डी चषक


Click for answer 
C. पहिला महिला कबड्डी विश्वचषक

3. पहिल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा कोठे पार पडल्या ?

A. नवी दिल्ली , भारत
B. पाटणा , भारत
C. तेहरान , इराण
D. इस्लामाबाद , पाकीस्तान

Click for answer 
B. पाटणा , भारत

4. पहिला महिला कब्बड्डी विश्वचषक भारतीय महिला संघाने कोणत्या संघाला अंतिम सामन्यात नमवत पटकावला ?

A. जपान
B. पाकीस्तान
C. बांगलादेश
D. इराण

Click for answer 
D. इराण

5. 'होळकर चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. हॉकी
B. कब्बड्डी
C. ब्रिज
D. क्रिकेट

Click for answer 
C. ब्रिज

6. निर्मल ग्राम अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत संपूर्णपणे हागणदारी मुक्त गावे करून 100 % स्वच्छता अभियानाचे उद्दीष्ट भारत सरकारने समोर ठेवले आहे ?

A. 2012
B. 2015
C. 2017
D. 2020

Click for answer 
C. 2017

7. कृषी क्षेत्राचा विचार करता 2012 हे वर्ष ____________ चे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे .

A. पूरक कृषी उत्पादन वर्ष
B. फलोत्पादन वर्ष
C. नगदी पिकांची शेती वर्ष
D. शाश्वत शेती वर्ष


Click for answer 
B. फलोत्पादन वर्ष

8.अलीकडेच निधन पावलेले ' रवी ' अर्थात रवी शंकर शर्मा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

A. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार
B. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार
C. लेखक
D. हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार

Click for answer 
D. हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार

9. 'ऑपरेशन ओडीसी डॉन' (Operation Odyssey Dawn) काय होते/आहे?

A. भारतीय लष्कराने केलेली नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई.
B. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी अमेरीकी सैन्याने केलेला हल्ला.
C. ओडीसातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी तेथील राज्यसरकारने हाती घेतलेली मोहीम.
D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.

Click for answer 
D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.

10. ______________________ प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ , अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या आहेत ?

A. बेसॉल्ट
B. पांढरा संगमरवर
C. ग्रॅनाईट
D. यापैकी नाही


Click for answer 
A. बेसॉल्ट
Read More »

प्रश्नमंजुषा -231


सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त

1. 1 मार्च 2012 चा विचार करता महाराष्ट्रात किती नगरपंचायती आहेत ?

A. 7
B. 221
C. 5
D. 35

Click for answer 
C. 5

2.भामरागड - चिरोली - गायखुरी या डोंगर रांगा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेजवळ आहेत ?

A. उत्तरेकडील
B. दक्षिणेकडील
C. पूर्वेकडील
D. पश्चिमेकडील

Click for answer 
C. पूर्वेकडील

3. 2010 -11 ह्या वर्षी महाराष्ट्राचा देशांतर्गत स्थूल उत्पन्नातील वाटा किती टक्के होता ?

A. 21.2 %
B. 35.9 %
C. 8.7 %
D. 14.9 %

Click for answer 
D. 14.9 %

4. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर ____________ आहे .

A. 74 %
B. 65 %
C. 82.9 %
D. 99.0 %

Click for answer 
C. 82.9 %

5. 2011 च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर ____________ आहे .


A. 74 %
B. 62 %
C. 82.9 %
D. 85 %

Click for answer 
A. 74 %

6. ' भारताचा मानव विकास अहवाल ' 2011 नुसार भारताचा मानव विकास निर्देशांक किती आहे ?

A. 0.572
B. 0.467
C. 0.815
D. 0.927


Click for answer 
B. 0.467

7. भारताचा मानव विकास अहवाल (Human Development Report)2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक__________किती आहे .

A. 0.467
B. 0.572
C. 0.615
D. 0.317

Click for answer 
B. 0.572

8. भारताचा मानव विकास अहवाल 2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांकानुसार देशात कितवा क्रमांक आहे ?

A. पहिला
B. पाचवा
C. दहावा
D. विसावा


Click for answer 
B. पाचवा

9. 'रोजगार हमी योजना' राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. लक्षद्वीप
D. उत्तरप्रदेश

Click for answer 
A. महाराष्ट्र

10. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. पाचवा

Click for answer 
B. दुसरा
Read More »

प्रश्नमंजुषा -229


सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी विशेष उपयुक्त

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
1. डॉ. हरीश हांडे आणि श्रीमती निलिमा मिश्रा यांना 2011 मध्ये कोणत्या पारितोषिकाने गौरविण्यात आले ?

A. नोबेल
B. बुकर
C. मॅगसेसे
D. संगीत नाटक अकादमी

Click for answer 
C. मॅगसेसे

2.भारतात सर्वाधीक ATM व शाखा असलेली बँक कोणती ?

A. बँक ऑफ इंडीया
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया
C. स्टेट बँक ऑफ इंडीया
D. पंजाब नॅशनल बँक

Click for answer 
C. स्टेट बँक ऑफ इंडीया

3. श्री. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय ______________ मंत्री आहेत ?

A. अवजड उद्योग
B. ऊर्जा
C. विज्ञान व तंत्रज्ञान
D. नागरी उड्डाण

Click for answer 
B. ऊर्जा

4. ' द व्हाईट टाईगर ' ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A. अमिताव घोष
B. अरविंद अडीगा
C. व्ही. एस. नायपॉल
D. सलमान रश्दी
Click for answer 
B. अरविंद अडीगा

5. खालीलपैकी कोणता करार आण्विक उर्जेच्या वापरा संबंधित आहे ?

A. NPT
B. SAFTA
C. GATT
D. लूक ईस्ट पॉलीसी

Click for answer 
A. NPT

6. भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या ?

A. 1947-48
B. 1950-51
C. 1951-52
D. 1955-56


Click for answer 
C. 1951-52

7. सर्वोच्च न्यायालयात टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली आहे ?

A. अण्णा हजारे
B. अरविंद केजरीवाल
C. बाबा रामदेव
D. सुब्रमण्यम स्वामी

Click for answer 
D. सुब्रमण्यम स्वामी

8. 57 व्या फिल्मफेअर पुरस्कारांत कोणत्या अभिनेत्रीस ' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ' चा पुरस्कार प्राप्त झाला ?

A. करीना कपूर
B. विद्या बालन
C. प्रियंका चोप्रा
D. कंगना रानावत
Click for answer 
B. विद्या बालन

9. ___________ ह्या क्रिकेटपटूवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरु आहेत ?

A. युवराज सिंग
B. शेन वॉर्न
C. अजय जडेजा
D. वरीलपैकी नाही

Click for answer 
A. युवराज सिंग

10. ' इटस् नॉट अबाऊट बाईक : माय जर्नी बॅक टू लाईफ ' हे स्वतः च्या कर्करोगाशी दिलेल्या लढयाबाबत चे आत्मचरीत्र कोणत्या महान खेळाडूचे आहे ?

A. युवराज सिंग
B. लान्स आर्मस्ट्रॉग
C. मायकेल शुमेकर
D. इम्रान खान

Click for answer 
B. लान्स आर्मस्ट्रॉग
Read More »

प्रश्नमंजुषा -226


सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी विशेष उपयुक्त

1. इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनचा उपयोग भारतात सर्वप्रथम कोणत्या वर्षी केला गेला ?

A. 1982
B. 1992
C. 1998
D. 2001

Click for answer 
A. 1982


2.'उद्यमी हेल्पलाईन' केंद्रशासनाने कोणत्या उद्योगांच्या विकासासाठी सुरु केली आहे ?

A. मोठे अवजड उद्योग
B. सूक्ष्म , लहान व मध्यम उद्योग
C. महिलांकडून चालविलेले उद्योग
D. फक्त कृषी / जैव अभियांत्रिकी शी संबंधित उद्योग

Click for answer 
B. सूक्ष्म ,लहान व मध्यम उद्योग

3. एका इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनमध्ये ( EVM ) जास्तीत जास्त किती मते नोंदविली जाऊ शकतात .

A. 2000
B. 2480
C. 3840
D. 10000

Click for answer 
C. 3840
इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन संबंधित अधिक माहिती पुढील ठिकाणी उपलब्ध आहे.
http://pib.nic.in/elections2009/volume1/Chap-39.pdf

4. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी केलेल्या निर्देशांनुसार सामान्य परिस्थितीत मतदान केंद्र तुमच्या घरापासून जास्तीत जास्त किती अंतरावर असू शकते ?

A. 1 किमी
B. 2 किमी
C. 3 किमी
D. 4 किमी

Click for answer 
B. 2 किमी

5.13 जानेवारी 2011 रोजी केंद्र शासनाकडून जाहीर केल्याप्रमाणे भारतातून कोणत्या प्रकारचा पोलीयो पूर्णपणे नामशेष झाला आहे ?

A. टाईप - 1
B. टाईप - 2
C. टाईप - 3
D. टाईप - 4


Click for answer 
A. टाईप - 1

6. आजच्या दिवसाचा(19 मार्च) विचार करता सध्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी(SC) किती जागा राखीव आहेत ?

A. 60
B. 75
C. 84
D. 105


Click for answer 
C. 84

7. लोकसभेत सध्या अनुसूचित जमातींसाठी ( ST ) किती जागा राखीव आहेत ?

A. 60
B. 85
C. 107
D. 47

Click for answer 
D. 47

8. संगणकामध्ये ' V-RAM ' कशासाठी वापरतात ?

A. आज्ञावली ( Programs) साठी
B. चित्रे ( Images ) व लिखित साहीत्य
C. व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता
D. वरीलपैकी नाही

Click for answer 
C. व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता

9.' राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत ' फेब्रुवारी - मार्च 2012 या कालावधीत कोणत्या यात्राचे आयोजन केले आहे ?

A. समर्थ भारत यात्रा
B. साक्षर भारत यात्रा
C. भारत पुननिर्माण यात्रा
D. राष्ट्रीय साक्षरता यात्रा

Click for answer 
B. साक्षर भारत यात्रा

10. ऑक्टोबर 2012 मध्ये ' मिनी प्रवासी भारतीय दिन ' कोणत्या देशात/शहरात आयोजीत केला जाणार आहे ?

A. मॉरीशस
B. न्यूयार्क
C. दुबई
D. त्रिनाद आणि टोबॅगो

Click for answer 
C. दुबई
Read More »

प्रश्नमंजुषा -219


1. पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या शहरात पार पडले ?

A. मुंबई
B. आळंदी
C. सांगली
D. नाशीक


Click for answer 
D. नाशीक

2. पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी _______________ यांची तर स्वागताध्यक्ष पदी _______________होते .

A. छगन भुजबळ , डॉ. सदानंद मोरे
B. डॉ. सदानंद मोरे , छगन भुजबळ
C. वसंत आबाजी डहाके , पृथ्वीराज चव्हाण
D. डॉ. सदानंद मोरे , वसंत आबाजी डहाके


Click for answer 
B. डॉ. सदानंद मोरे , छगन भुजबळ

3. डॉ. आंबेडकरांचे स्मारक दादर चैत्यभूमी जवळील ______________ च्या जागेवर होण्यास महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आणि भारताच्या पंतप्रधानांनी तत्वतः मान्यता दिली आहे .

A. कोहीनूर मिल
B. इंदू मिल
C. फिनीक्स मिल
D. श्रीनिवास मिल

Click for answer 
B. इंदू मिल

4. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी नवीनीकरण विकास मिशन ( JNNURM ) योजनेसाठी सन 2010 वर्षाकरीता महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले ?

A. तीन
B. पाच
C. दहा
D. वीस
Click for answer 
B. पाच

5. राष्ट्रीय ( नागरी ) जल पुरस्कारांमध्ये _______________ ला राष्ट्रीय स्तरावरचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला .

A. पनवेल नगरपालीका ( जि. रायगड )
B. नवी मुंबई नगरपालीका
C. अमरावती नगरपालीका
D. मलकापूर नगरपंचायत ( जि. सातारा )


Click for answer 
D. मलकापूर नगरपंचायत ( जि. सातारा )


6. राष्ट्रीय स्तरावरचा दुस‍र्या क्रमांकाचा राष्ट्रीय ( नागरी ) जल पुरस्कार ______________ ला प्रदान करण्यात आला .

A. अमरावती महानगरपालिका
B. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
C. मुंबई महानगरपालिका
D. नागपूर महानगरपालिका

Click for answer 
A. अमरावती महानगरपालिका

7. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ' जागतिक आर्थिक परिषद ' नोव्हेंबर 2011 मध्ये कोठे पार पडली ?

A. मुंबई
B. पुणे
C. बेंगलोर
D. दिल्ली

Click for answer 
A. मुंबई

8. अलीकडेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणांवर महानगरपालिका स्थापण्यास मंजूरी दिली आहे ?
( निकष : तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या )

A. लातूर , निफाड
B. लातूर , चंद्रपूर
C. बुलढाणा , चंद्रपूर
D. बुलढाणा , लातूर

Click for answer 
B. लातूर , चंद्रपूर

9. राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी किती विशेष न्यायालये स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ?

A. दोन
B. सहा
C. पंचवीस
D. साठ

Click for answer 
B. सहा

स्पष्टीकरण : प्रत्येक महसूल विभागात एक याप्रकारे 6 विशेष न्यायालये उभारली जाणार .

10. 1 जानेवारी 2012 पासून महाराष्ट्रातील पोलीस पाटीलांचे मानधन किती आहे ?

A. 800 रु. दरमहा
B. 2000 रु. दरमहा
C. 3000 रु. दरमहा
D. 5000 रु. दरमहा

Click for answer 
C. 3000 रु. दरमहा

स्पष्टीकरण : 1 जानेवारी 2012 पासून पूर्वीच्या 800 रु.प्रतिमहा इतक्या मानधनात सुधारणा करून ते आता 3000 रु.प्रतिमहा दिले जाईल असा निर्णय झाला आहे .

Read More »