चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018


मे 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. शिवांगी पाठक ही 16 वर्षीय तरुणी अलीकडे का चर्चेत होती ?

A. शिडाच्या होडीतून पृथ्वी प्रदक्षिणा केली.
B. बुध्दिबळातील ग्रॅन्डमास्टर किताब मिळविला.
C. ऑस्ट्रेलियन ओपन साठी पात्र ठरलेली तरुण टेनिसपटू
D. शिखर एव्हरेस्ट सर केले


Click for answer

D. शिखर एव्हरेस्ट सर केले

अवघ्या 16 वर्षांच्या शिवांगी पाठक हिने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करुन इतिहास घडवला आहे. एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला.

2. निपाह विषाणूच्या प्रभावामुळे होत असलेल्या मृत्यूमुळे कोणते राज्य चर्चेत आहे ?

A. तामिळनाडू
B. केरळ
C. कर्नाटक
D. आसाम


Click for answer

B. केरळ

3. भाजप नेते येडियुरप्पा यांनी कितव्यांदा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती?

A. पहिल्यांदा
B. दुसऱ्यांदा
C. तिसऱ्यांदा
D. यापैकी नाही


Click for answer

C. तिसऱ्यांदा

तथापि , बहुमत सिध्द न करता आल्याने त्यांनी लगेच पदाचा राजीनामा दिला.

4. नुकतीच खालीलपैकी कोणाची झिम्बाब्वेच्या हंगामी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

A. अजय जडेजा
B. लालचंद राजपूत
C. राहुल द्रविड
D. रॉबिन सिंग


Click for answer

C. लालचंद राजपूत

भारतीय संघाचे माजी खेळाडू लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेच्या हंगामी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान-झिम्बाब्वे तिरंगी मालिकेपासून राजपूत आपल्या पदाचा कार्यभार स्विकारतील.

2007 साली पहिल्या टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे राजपूत व्यवस्थापक होते.

यानंतर त्यांनी अफगाणिस्तानच्या संघाला प्रशिक्षण दिलं होतं. त्यांच्यात मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तानच्या संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला होता.

5. बांगलादेशातीलअखुरा गाव आणि पूर्वोत्तरमधील कोणत्या राज्याची राजधानी आता रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे ?

A. मेघालय
B. मणिपूर
C. त्रिपुरा
D. सिक्कीम


Click for answer

C. त्रिपुरा

टेक्समाको रेल या कंपनीला 200 कोटी रुपयांचे हे कंत्राट मिळाले आहे. बांगलादेशातील चितगाँव जिल्ह्यातील अखुरा गाव आणि भारतातील त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा यांच्यामध्ये 45 किमीचे अंतर आहे. या मार्गासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

या प्रकल्पाची पूर्तता करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ त्रिपुरा आणि बांगलादेश यांच्यासाठी सेवा सुरु होणार नसून कोलकाता आणि आगरतळा यांच्यामधील प्रवासाचे अंतरही कमी होणार आहे.

त्याचप्रमाणे भारताचा चितगाँव बंदरापर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामधील द्वीपक्षीय संबंध आणि व्यापार सुधारण्यासाठी या मार्गाचा विशेष फायदा दोन्ही देशांना होणार आहे.

6. बोगीबील हा कोणत्या राज्यांना जोडणारा ब्रह्मपुत्रेवरील पूल लवकरच खुला होणार आहे ?

A. अरुणाचल प्रदेश आणि आसाम
B. आसाम आणि नागालँड
C. मणिपूरआणि मिझोराम
D. अरुणाचल प्रदेश आणि मेघालय


Click for answer

A. अरुणाचल प्रदेश आणि आसाम

7. सीएमएस-इंडियाने केलेल्या देशातील 13 मोठय़ा राज्यांमध्ये केलेल्या पाहणीत कोणते राज्य देशातील सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचे आढळून आले ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. दिल्ली
D. तामिळनाडू


Click for answer

D. तामिळनाडू

तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर तर तेलंगणा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

8. कर्नाटक राज्यात विधानसभेतील विश्वासमत प्रस्तावाच्यावेळी कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती ?सदर निवडीवर विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केली होती .

A. के. जी. बोपय्या
B. के.एन. नागराजू
C. डी.के. शिवकुमार
D. सुरेश बी.एस


Click for answer

A. के. जी. बोपय्या

9. सोलापूर विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे ?

A. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
B. महात्मा बसवेश्वर
C. बहिणाबाई चौधरी
D. महात्मा फुले


Click for answer

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

विद्यापीठाच्या नावाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार 31 मे रोजी अहिल्यादेवी जयंतीचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. तर विमानतळाला महात्मा बसवेश्वर विमानतळ असे नाव देण्यात येईल व रेल्वे स्थानकाला सिद्धेश्वरांचे नाव देणार आहे .

10. कर्नाटकचे राज्यपाल कोण आहेत ?

A. पद्मनाभ बालकृष्ण आचार्य
B. केशरी नाथ त्रिपाठी
C. वजुभाई वाला
D. चेन्नामनेनी विद्यासागर राव


Click for answer

C. वजुभाई वाला
Read More »

इतिहास प्रश्नसंच-15


समाजसुधारक/ महनीय व्यक्ती या विषय घटकावर आधारित.

1. शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली ?

A. पंडीता रमाबाई
B. धोंडो केशव कर्वे
C. विठ्ठल रामजी शिंदे
D. गोपाळ गणेश आगरकर


Click for answer

A. पंडीता रमाबाई

2. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

A. लोकमान्य टिळक
B. डॉ. पंजाबराव देशमुख
C. लोकहितवादी
D. गोपाळ गणेश आगरकर


Click for answer

D. गोपाळ गणेश आगरकर

3. 'स्वावलंबी शिक्षण ' हे खालीलपैकी कोणत्या शिक्षण संस्थेचे ध्येय आहे ?

A. डेक्कन एज्युकेशन सोसायटी
B. रयत शिक्षण संस्था
C. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था
D. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था


Click for answer

B. रयत शिक्षण संस्था

4. महाराष्ट्रातील 'मुरळी आणि देवदासी ' प्रथा नष्ट व्हावी यासाठी खालीलपैकी कोणी सतत प्रयत्न केले ?

A. गोपाळ हरी देशमुख
B. धोंडो केशव कर्वे
C. विठ्ठल रामजी शिंदे
D. गोपाळ गणेश आगरकर


Click for answer

C. विठ्ठल रामजी शिंदे

5. डॉ .आंबेडकरांनी मंदीर प्रवेश सत्याग्रह कोठे केला ?

A. महाड
B. नाशिक
C. मुंबई
D. पंढरपूर


Click for answer

B. नाशिक

6. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्यूथर ' म्हणतात ?

A. न्यायमूर्ती रानडे
B. लोकहितवादी
C. लोकमान्य टिळक
D. महात्मा फुले


Click for answer

D. महात्मा फुले

7. महात्मा फुले यांनी मुलींची शाळा सर्वप्रथम केव्हा आणि कुठे सुरू केली ?

A. 3 जुलै 1848 रोजी भिडे यांच्या वाड्यात
B. 3 जुलै 1848 रोजी धनकवडी येथे
C. 3 जुलै 1848 रोजी फुले यांच्या स्वतःच्या घरी
D. 3 जुलै 1848 रोजी शारदाश्रम येथे


Click for answer

A. 3 जुलै 1848 रोजी भिडे यांच्या वाड्यात

8. ठक्करबाप्पा यांनी आपले आयुष्य कशासाठी वाहिले होते ?

A. जातीयता नष्ट करण्यासाठी
B. आदिवासींच्या उन्नतीसाठी
C. स्त्रियांच्या उद्धारासाठी
D. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी


Click for answer

B. आदिवासींच्या उन्नतीसाठी

9. मुक्त आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते ?

A. सातारचे प्रतापसिंह महाराज
B. औंधचे पंत प्रतिनिधी
C. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड
D. कोल्हापूरचे शाहू महाराज


Click for answer

D. कोल्हापूरचे शाहू महाराज

10. 'मुरळी प्रतिबंधक चळवळ' कोणी सुरू केली ?

A. महात्मा फुले
B. विष्णुशास्त्री पंडित
C. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
D. महर्षी धोंडो केशव कर्वे


Click for answer

C. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
Read More »

इतिहास प्रश्नसंच-14


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.

1. देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा मंजूर झाला, त्यावेळी भारतात कोण गव्हर्नर जनरल होते ?


A. लॉर्ड कॅनिंग
B. लॉर्ड लिटन
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड कर्झन


Click for answer

B. लॉर्ड लिटन

2. कैसर-इ-हिंद' ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती ?

A. विजयालक्ष्मी पंडित
B. पंडिता रमाबाई
C. सरोजिनी नायडू
D. इंदिरा गांधी


Click for answer

B. पंडिता रमाबाई

3. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?

A. प्लासीची लढाई - बहादूरशहा जफर
B. लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्था
C. महात्मा गांधी - होमरूल चळवळ
D. डॉ. आंबेडकर - डिप्रेस्ड क्लास मिशन


Click for answer

B. लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्था

4. मवाळांचा नेता कोण होता?

A. टिळक
B. गोखले
C. आगरकर
D. रानडे


Click for answer

B. गोखले

5. जागृत महाराष्ट्राची विचारधारी दर्शविणारी एक जोडी निवडा.

A. न्या.तेलंग - भाऊ दाजी लाड -लोकहितवादी
B. बाळशास्त्री जांभेकर-गणेश जोशी-सावरकर व्ही. डी
C. बाळ गंगाधर टिळक - आगरकर -रानडे
D. एम. जी.गोखले - म. जोतिबा फुले -भाऊ दाजी लाड


Click for answer

B. बाळ गंगाधर टिळक - आगरकर -रानडे

6. ________ या वर्षी गोव्याचा प्रदेश पोर्तुगीज अंमलातून मुक्त झाला.

A. 1947
B. 1950
C. 1956
D. 1961


Click for answer

D. 1961

7. सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

A. व्ही. के. कृष्ण मेनन
B. वाय. बी. चव्हाण
C. सरदार स्वर्ण सिंग
D. बाबु जगजीवनराम


Click for answer

A. व्ही. के. कृष्ण मेनन

8. खालीलपैकी कोणती एक जोडी योग्य प्रकारे जुळली आहे ते ओळखा .

A. 1969- भारत - रशिया करार
B. 1960 - स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती
C. 1962- भारत - पाकिस्तान युद्ध
D. 1965 - भारत - चीन युद्ध


Click for answer

B. 1960 - स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती

9. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण ?

A. सी. राजगोपालचारी
B. डॉ. आंबेडकर
C. महात्मा गांधी
D. पंडित जवाहरलाल नेहरु


Click for answer

A. सी. राजगोपालचारी

10. म. फुले यांचा काँग्रेस नेतृत्त्वावर विश्वास नव्हता, कारण ___________

A. तिच्या नेत्यांनी महार, मांग व शेतक-यांच्या समस्यांमध्ये रस घेतला नाही.
B. या संघटनेने त्यांना योग्य तो मान दिला नाही.
C. काँग्रेसचे ध्येयधोरण त्यांना मान्य नव्हते.
D. या संघटनेत उच्चवर्णीय, पार्सी आणि युरोपियन यांचा अधिक भरणा होता.


Click for answer

D. या संघटनेत उच्चवर्णीय, पार्सी आणि युरोपियन यांचा अधिक भरणा होता.
Read More »

इतिहास प्रश्नसंच-13


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.

1. गुजरातमधील शेतक-यांनी__________यांच्या नेतृत्वाखाली 'कर विरोधी मोहीम' संघटित केली होती.


A. महात्मा गांधी
B. सरदार वल्लभभाई पटेल
C. मोतीलाल नेहरु
D. एस. ए. डांगे


Click for answer

B. सरदार वल्लभभाई पटेल

2. मद्रासमध्ये होमरुल चळवळ___________ यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली.

A. बाळ गंगाधर टिळक
B. गोपाळ गणेश आगरकर
C. गोपाळ कृष्ण गोखले
D. डॉ. अॅनी बेझंट


Click for answer

D. डॉ. अॅनी बेझंट

3. 'फॉरवर्ड ब्लॉक' चे संस्थापक कोण होते ?

A. खान अब्दुल गफार खान
B. सुभाषचंद्र बोस
C. मोतीलाल नेहरू
D. सी.आर. दास


Click for answer

B. सुभाषचंद्र बोस

4. स्वराज्य पक्षाची स्थापना __________ह्यासाठी झाली.

A. सरकारमध्ये सत्ता सहभाग मिळविणे
B. ब्रिटिशांना भारत सोडण्यास सांगणे
C. कौन्सिल प्रवेश करून कामकाजांतर्गत अडथळे निर्माण करणे
D. ब्रिटिशांचे विरुद्ध लोकांना संघर्ष करावयास सांगणे


Click for answer

C. कौन्सिल प्रवेश करून कामकाजांतर्गत अडथळे निर्माण करणे

5. 'गुरुकुल'ची स्थापना_____________यांनी केली.

A. लाला हंसराज
B. लाला लजपतराय
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. स्वामी श्रद्धानंद


Click for answer

D. स्वामी श्रद्धानंद

6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते. कारण___________

A. पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे
B. पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे
C. मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे
D. मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे


Click for answer

A. पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे

7. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली _______ येथे भरले होते.

A. जळगाव
B. धुळे
C. फैजपूर
D. चाळीसगाव


Click for answer

C. फैजपूर

8. सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना__________ च्या काळात झाली.

A. होमरूल चळवळ
B. असहकारितेची चळवळ
C. सविनय कायदेभंग
D. भारत छोडो चळवळ


Click for answer

D. भारत छोडो चळवळ

9. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील 'तूफान सेना' स्थापन झाली होती ?

A. सोलापूर
B. पुणे
C. सातारा
D. कोल्हापूर


Click for answer

C. सातारा

10. रॅण्डचा वध करणा-या चाफेकर बंधूंची नावे सांगा.

A. दामोदर आणि गोपाळ
B. बाळकृष्ण आणि विनायक
C. बाळकृष्ण आणि वासुदेव
D. दामोदर आणि बाळकृष्ण


Click for answer

D. दामोदर आणि बाळकृष्ण
Read More »

इतिहास प्रश्नसंच-12


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.

1. प्रसिध्द ग्रंथ "दि स्टोरी ऑफ दि इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स'' ____________यांनी लिहिला.


A. सरदार पटेल
B. व्ही. पी. मेनन
C. कृष्ण मेनन
D. आर.सी. मजुमदार


Click for answer

B. व्ही. पी. मेनन

2. "जोसेफ मॅझिनीचे चरित्र” कोणी लिहिले ?

A. लोकमान्य टिळक
B. गो. कृ. गोखले
C. वि. दा. सावरकर
D. ग. ह. खरे


Click for answer

C. वि. दा. सावरकर

3. राष्ट्रगान 'वंदे मातरम्' _________ यामधून घेतले आहे.

A. रविंद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली'मधून
B. बंकिमचंद्र चटर्जीच्या 'आनंदमठ'मधून
C. शरदचंद्र चटर्जीच्या 'श्रीकांत'मधून
D. यापैकी कशातूनही नाही


Click for answer

B. बंकिमचंद्र चटर्जीच्या 'आनंदमठ'मधून

4. '1857 चे स्वातंत्र्य समर' या ग्रंथाचे लेखक कोण ?

A. शहीद भगतसिंह
B. रास बिहारी बोस
C. बाळशास्त्री जांभेकर
D. विनायक दामोदर सावरकर


Click for answer

D. विनायक दामोदर सावरकर

5. भारतात मतदानाचा मर्यादित अधिकार _________ च्या कायद्याने प्रथमच देण्यात आला.

A. 1982
B. 1909
C. 1919
D. 1935


Click for answer

B. 1909

6. 1919 च्या कायद्याचा प्रमुख उद्देश______हा होता.

A. गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ
B. स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात
C. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा
D. जबाबदार शासन पध्दतीचा प्रारंभ


Click for answer

D. जबाबदार शासन पध्दतीचा प्रारंभ

7. "1935 चा भारत सरकारचा कायदा हा संपूर्णत: कुजलेला, मूळत: वाईट आणि पूर्णत: अस्वीकार्य आहे', असे उद्गार कुणी काढले?

A. पं. नेहरु
B. म. गांधी
C. एम. ए. जिना
D. सरदार पटेल


Click for answer

B. एम. ए. जिना

8. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला त्यावेळी इंग्लंडमध्ये कोणता पक्ष सत्तेवर होता ?

A. मजूर पक्ष
B. उदार पक्ष
C. हुजूर पक्ष
D. लोकशाहीवादी पक्ष


Click for answer

A. मजूर पक्ष

9. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?

A. रौलेट कायदा-1916
B. गांधी आयर्विन करार-1931
C. लखनौ करार-1918
D. आर्म्स अॅक्ट-1893


Click for answer

B. गांधी आयर्विन करार-1931

10. 'पाकिस्तान' संकल्पनेचा उद्घोष करणारी पहिली व्यक्ती कोण ?

A. मोहम्मद अली जीना
B. सर सय्यद अहमद खान
C. लियाकत अली खान
D. कवी इक्बाल


Click for answer

D. कवी इक्बाल
Read More »

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018


मे 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. राष्ट्रपिता म. गांधीजी यांना दक्षिण आफ्रिकेत ‘केवळ गौरवर्णीयासाठी राखीव असलेल्या रेल्वे डब्यातून खाली उतरविण्यात आले होते त्या घटनेला येत्या 7 जून रोजी किती वर्षे पूर्ण होत आहेत ?

A. 75 वर्षे
B. 100 वर्षे
C. 125 वर्षे
D. 150 वर्षे


Click for answer

C. 125 वर्षे

राष्ट्रपिता म. गांधीजी यांना दक्षिण आफ्रिकेत 'केवळ गौरवर्णीयासाठी' राखीव असलेल्या रेल्वे डब्यातून खाली उतरविण्यात आले होते त्या घटनेला 125 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील राजकीय नेत्यांसह 300 मान्यवर सुषमा स्वराज यांच्यासह पेन्ट्रिच स्थानक ते पीटरमारित्झबर्ग स्थानक असा प्रतीकात्मक प्रवास करणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील भारतीय उच्चायुक्त रुचिरा कम्बोज.

2. "मॅक्स थंडर" हा कोणत्या देशांच्या हवाई दलाचा संयुक्त लष्करी सराव अलीकडेच चर्चेत होता ?

A. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया
B. अमेरिका आणि दक्षिण कोरिया
C. जपान आणि दक्षिण कोरिया
D. चीन आणि जपान


Click for answer

B. अमेरिका आणि दक्षिण कोरिया

परस्परांचे शेजारी आणि पक्के वैरी असणारे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांदरम्यान होणारी उच्चस्तरीय बैठक उत्तर कोरियाने रद्द केल्याचे वृत्त आहे. यामागे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये होणाऱ्या 'मॅक्स थंडर' या दोन्ही देशांच्या हवाई दलाचा संयुक्त लष्करी सराव कारणीभूत मानले जात आहे.

3. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री पदाचा पदभार कोणाकडे सुपूर्त करण्यात आला आहे ?

A. स्मृती इराणी
B. प्रकाश जावडेकर
C. अरूण जेटली
D. राज्यवर्धन राठोड


Click for answer

D. राज्यवर्धन राठोड

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचे खाते काढून घेण्यात आले असून त्यांच्या जागी राज्यवर्धन राठोड यांची वर्णी लागली आहे. राज्यवर्धन राठोड हे केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत. त्यांची वर्णी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रीपदी लागली आहे. त्यांच्याकडे क्रीडा खात्यासह माहिती आणि प्रसारण खात्याचा पदभार देण्यात आला आहे.

तर स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग खातेच राहणार आहे.

याशिवाय, राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांना बढती देण्यात आली आहे. पेयजल व स्वच्छता या खात्याच्या कार्यभारातून त्यांना मुक्त करण्यात आले असून, माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

अल्फॉन्स कन्ननथनम यांच्याकडील इलेक्‍ट्रॉनिक्‍स खाते काढून घेण्यात आले असून, ते आता केवळ पर्यटन मंत्री असतील.

4. अर्थमंत्री अरूण जेटलींकडून अर्थ खाते तात्पुरते काढण्यात आले असून अर्थ खात्याची जबाबदारी तूर्तास कोणाकडे देण्यात आली आहे ?

A. नितीन गडकरी
B. निर्मला सितारामन
C. पियुष गोयल
D. प्रकाश जावडेकर


Click for answer

C. पियुष गोयल

अर्थमंत्री अरूण जेटलींकडून अर्थ खाते तात्पुरते काढण्यात आले असून अर्थ खात्याची जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. अरूण जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत पियुष गोयल सांभाळणार आहेत. मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेले जेटली मागील एक महिन्यांपासून डायलिसिसवर आहेत. त्याचमुळे अर्थ खात्याची जबाबदारी आता रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. अरूण जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत पियुष गोयल अर्थ खात्याचा पदभार सांभाळतील.

5. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली ?

A. शरद पवार
B. शशांक मनोहर
C. रवी शास्त्री
D. सौरभ गांगुली


Click for answer

B. शशांक मनोहर

आयसीसीच्या अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. 2016 साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती, यानंतर अध्यक्षपदाची मनोहर यांची ही दुसरी टर्म असणार आहे.

6. पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू मन्सूर अहमद यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या खेळाशी सबंधित होते ?

A. क्रिकेट
B. हॉकी
C. फुटबॉल
D. कुस्ती


Click for answer

B. हॉकी

हृदय प्रत्यारोपणासाठी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी करणारे पाकिस्तानचे माजी दिग्गज हॉकी खेळाडू मन्सूर अहमद यांचे नुकतेच निधन झालं. 1994 मध्ये पाकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या संघाचा हिस्सा राहिलेले मन्सूर अहमद उपचारासाठी भारताकडे विनंती केली होती.

7. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’त यंदा देशभरातील शहरांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराने पटकावला ?

A. भोपाळ
B. मुंबई
C. परभणी
D. इंदूर


Click for answer

D. इंदूर

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’त यंदा देशभरातील शहरांमध्ये मध्य प्रदेशातील इंदूरने प्रथम, भोपाळने दुसरा क्रमांक, तर चंदिगडने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

तर राज्यांच्या राजधान्यांच्या श्रेणीमध्ये मुंबईने आघाडीचे स्थान मिळविले आहे.

भारतातील मोठय़ा स्वच्छ शहराचा मान आध्र प्रदेशमधील विजयवाडा शहराला मिळाला आहे.

नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद देणाऱ्या शहरांमध्ये राजस्थानमधील कोटा, महाराष्ट्रातील परभणीने, नावीन्यपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट कृती श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील नागपूरने आणि गोव्यातील पणजीने, तर सौर ऊर्जा व्यवस्थापन श्रेणीत नवी मुंबई, तिरुपतीने आघाडीचे स्थान पटकावले आहे.

8. जागतिक संग्रहालय दिन कधी साजरा केला जातो ?

A. 2 मे
B. 8 मे
C. 12 मे
D. 18 मे


Click for answer

D. 18 मे

9. गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये निघालेली सहा महिला नौदल अधिका-यांचा समावेश असलेली कोणती शिडाची बोट जगभ्रमंती करुन येत्या सोमवारी 21 मे रोजी गोव्यात परतणार आहे ?

A. आयएनएसव्ही तारीणी
B. आयएनएसव्ही म्हादेई
C. आयएनएसव्ही कदाम्बिनी
D. आयएनएसव्ही भवानी


Click for answer

A. आयएनएसव्ही तारीणी

या प्रवासात महिला नौदल अधिकारी 21600 सागरी मैल अंतर पार करणार आहेत. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलाच प्रयत्न असून यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. महिला अधिकाऱ्यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन् विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.

आयएनएसव्ही चे पूर्ण रूप= "Indian Navy sailing vessel"

10. लोकपाल निवड समितीमध्ये नुकतीच कोणाची ख्यातनाम विधिज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे ?

A. मुकुल रोहतगी
B. टी आर अंध्यारुजिना
C. राम जेठमलानी
D. श्रीहरी अणे


Click for answer

A. मुकुल रोहतगी

लोकपाल निवड समितीमध्ये ख्यातनाम विधिज्ञाबरोबर, भारताचे पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेता, लोकसभेच्या सभापती अशा सदस्यांचा समावेश असतो.

यापुर्वी ख्यातनाम विधिज्ञ या पदावर असणारे पी. पी. राव यांचे 11 सप्टेंबर 2017 रोजी निधन झाल्याने ते पद रिक्त होते. हे पद रिक्त असल्यामुळे लोकपाल निवडीसाठी विलंब होत होता.

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सत्तेत आल्यानंतर 2014 साली रोहतगी यांची नेमणूक महान्य़ायवादी (अॅटर्नी जनरल) पदावर करण्यात आली होती. मात्र जून 2017मध्ये रोहतगी यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018
Read More »

भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.

1. पक्षांतर कायद्या संबंधीची घटना दुरुस्ती कोणती ?

A. 61 वी घटनादुरुस्ती
B. 91 वी घटनादुरुस्ती
C. 42 वी घटनादुरुस्ती
D. 24 वी घटनादुरुस्ती


Click for answer

B. 91 वी घटनादुरुस्ती

2. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची निर्मिती होते ?

A. कलम 256
B. कलम 280
C. कलम 119
D. कलम 360


Click for answer

B. कलम 280

3. भारताचे महानियंत्रक आणि महालेखानिरीक्षक यांच्याकडे एक राज्य वगळता सर्व राज्यातील राज्य सरकारच्या खात्यांची देखभाल सोपविण्यात आली आहे. कोणत्या एका राज्याचा यामध्ये समावेश नाही ?

A. सिक्कीम
B. गोवा
C. अरुणाचल प्रदेश
D. मिझोराम


Click for answer

A. सिक्कीम

4. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींची संख्या किती ?

A. 20
B. 23
C. 15
D. 19


Click for answer

D. 19

5. भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदार असतात ?

A. लोकसभेचे निर्वाचित सदस्य
B. राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
C. विधानसभेचे निर्वाचित सदस्य
D. वरील सर्वच


Click for answer

D. वरील सर्वच

6. सनदी सेवकांना __________________ बनण्याची परवानगी नाही.

A. संसद सदस्य
B. मुख्य निर्वाचन आयुक्त
C. विद्यापीठाचे कुलगुरू
D. चौकशी आयोगाचे प्रमुख


Click for answer

A. संसद सदस्य

7. आपल्या राज्यघटनेतील सत्तेच्या विभागणीमुळे ______________________ निर्माण झाले आहे.

A. समर्थ केंद्रशासन
B. दुबळे केंद्रशासन
C. समर्थ केंद्र शासन व समर्थ घटक राज्ये
D. दुबळे केंद्रशासन व दुबळी घटक राज्ये


Click for answer

A. समर्थ केंद्रशासन

8. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षक कोण आहे ?

A. भारतीय संसद
B. राष्ट्रपती
C. भारताचे सर्वोच्च न्यायालय
D. वरील सर्व


Click for answer

C. भारताचे सर्वोच्च न्यायालय

9. भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे ?

A. कलम 227
B. कलम 368
C. कलम 370
D. कलम 352


Click for answer

B. कलम 368

10. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान खालीलपैकी कोण भूषवितो ?

A. राज्यसभा अध्यक्ष
B. लोकसभेचे सभापती
C. पंतप्रधान
D. भारताचे राष्ट्रपती


Click for answer

B. लोकसभेचे सभापती
Read More »

भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.

1. राज्य शासनाला कायदे विषयक बाबींवर सल्ला देण्याचे काम खालील पैकी कोणाचे असते ?

A. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
B. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
C. महान्यायवादी
D. महाधिवक्ता


Click for answer

D. महाधिवक्ता

2. भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी कोण ?

A. महाधिवक्ता
B. महान्यायवादी
C. कायदामंत्री
D. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश


Click for answer

B. महान्यायवादी

3. भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली कशास म्हणतात ?

A. घटनेचा सरनामा
B. राज्याची मार्गदर्शक तत्वे
C. मूलभूत हक्कांविषयी कलमे
D. घटनात्मक संरक्षण उपायाची कलमे


Click for answer

A. घटनेचा सरनामा

4. नियंत्रक आणि महालेखापाल यांची नेमणूक कोणाव्दारे करण्यात येते ?

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. अर्थमंत्री
D. विरोधी पक्षनेते


Click for answer

A. राष्ट्रपती

5. राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो ?

A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. संसदीय कामकाजमंत्री
D. महसूलमंत्री


Click for answer

B. मुख्यमंत्री

6. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणासमोर शपथ घ्यावी लागते ?

A. राज्यपाल
B. मुख्य न्यायमूर्ती
C. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
D. राज्याचे महाधिवक्ता


Click for answer

A. राज्यपाल

7. राज्याचे अंदाजपत्रक कोणत्या सभागृहात मांडले जाते ?

A. लोकसभा
B. राज्यसभा
C. विधानसभा
D. विधान परिषद


Click for answer

C. विधानसभा

8. बालकामगार अधिनियम 1986 नुसार किती वर्षांखालील वयाच्या मुलांचा बाल कामगार म्हणून उल्लेख होतो ?

A. 10 वर्षे
B. 12 वर्षे
C. 14 वर्षे
D. 18 वर्षे


Click for answer

C. 14 वर्षे

9. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे ?

A. 2 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे
D. 6 वर्षे


Click for answer

D. 6 वर्षे

10. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वात संस्था कोणती ?

A. संसद
B. सर्वोच्च न्यायालय
C. विधी मंत्रालय
D. महान्यायवादी


Click for answer

A. संसद
Read More »

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018


एप्रिल-मे 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. भारतातील घटकराज्याचे सर्वाधीक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा बहुमान पवनकुमार चामलिंग यांनी मिळवला आहे. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?

A. मणिपूर
B. मिझोरम
C. सिक्कीम
D. अरुणाचल प्रदेश


Click for answer

C. सिक्कीम

ते सिक्किम राज्याचे गेली 23 वर्षे 5 महिने इतका प्रदीर्घकाळ मुख्यमंत्री आहेत. 16 मे 1975 साली सिक्किमचा भारतात 22वे राज्य म्हणून समावेश झाला. चामलिंग यांनी सलग पाच निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता.

29 एप्रिल रोजी त्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडला. त्या आधी मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहाण्याचा विक्रम ज्योती बसू यांच्या नावावर होता.

सिक्किम राज्याच्या गेल्या 43 वर्षांमध्ये 23 वर्षे एकट्या चामलिंग यांनीच मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे.

सिक्किमची लोकसंख्या केवळ 6 लाख इतकी असून लवकरच या राज्यातील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन होत असून त्याबरोबर 44 किमीचा रेल्वेमार्गही येत आहे. 2008 मध्येच उघड्यावर शौच करण्याची प्रथा बंद करणारे सिक्किम हे पहिले राज्य बनले. 15 वर्षांपुर्वी सिक्किमने राज्यामध्ये रासायनिक खते आणि रसायने वापरण्यावर बंदी घातली त्यामुळे आज सिक्किम पूर्णतः सेंद्रिय शेती करणारे राज्य बनले आहे. सिक्किममध्ये चामलिंग सरकारने सर्व नागरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के राखीव जागा टेवल्या असून सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

2. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी मुक्तिनाथ मंदिरात पुजा केल्याने ते मंदिर चर्चेत होते. बौद्ध व हिंदुधर्मीयांसाठी सारखेच पवित्र क्षेत्रअसणाऱ्या ह्या मंदिरात प्रार्थना करणारे मोदी हे पहिलेच जागतिक नेते ठरले आहेत. मुक्तिनाथ मंदिर कोणत्या देशात आहे ?

A. भारत
B. नेपाळ
C. थायलंड
D. भूतान


Click for answer

B. नेपाळ

मुक्तिनाथ मंदिर हे 12172 फूट उंचीवर असून, ते भारत व नेपाळ यांच्यातील मोठा सांस्कृतिक दुवा आहे. या मंदिरात मानवी आकाराची विष्णूची सोन्याची मूर्ती असून तेथे मोदी यांनी प्रार्थना केली. मुक्तिनाथ मंदिर हे हिंदू व बौद्ध यांचे पवित्र क्षेत्र असून, ते मुक्तिनाथ खोऱ्यात आहे.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू असलेल्या नेपाळ दौऱ्यात कोणत्या बसमार्गांचे उद्घाटन केले ?

A. काठमांडू- गया
B. जनकपूर- अयोध्या
C. बिराटनगर- दिल्ली
D. पोखरणा- हरीव्दार


Click for answer

B. जनकपूर- अयोध्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा नेपाळ दौरा शुक्रवारपासून सुरू झाला असून, तिथे पोहोचल्यावर मोदी यांनी सीतेचे माहेर असलेल्या जनकपूरहून तिचे सासर असलेल्या अयोध्येला जाण्यासाठी विशेष बससेवेचे उद्घाटन केले. या भेटीत मोदी व नेपाळचे पंतप्रधान ओली 900 मेगावॅटच्या अरुण-३ वीज प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पामुळे दोन्ही देशांना वीज मिळेल.

4. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची पाउल असलेले, रेल्वेमध्ये विमानाप्रमाणेच ब्लॅक बॉक्स असलेल्या रेल्वेच्या डब्यांचं अनावरण नुकतेच कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?

A. नवी दिल्ली
B. सिकंदराबाद
C. रायबरेली
D. कोलकाता


Click for answer

C. रायबरेली

5. दीपिकाकुमारी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. बुध्दिबळ
B. तिरंदाजी
C. कुस्ती
D. बॅडमिंटन


Click for answer

B. तिरंदाजी

तिच्यावरील 'लेडीज फर्स्ट' ही डॉक्‍युमेंटरी चांगलीच लोकप्रिय आहे. तिला निर्माते सुरेश सेठ भगत आणि दिग्दर्शक मनीष सिन्हा यांनी "बिसाही' या चित्रपटासाठी करारबद्ध केले होते. या चित्रपटात तिची प्रमुख भूमिका होती. तथापि तिने ऑलिंपिक पूर्वतयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटात काम करण्याचा करार रद्द केला आहे.

6. पुढील महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व कोणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे ?

A. महेंद्रसिंग धोणी
B. अजिंक्‍य रहाणे
C. विराट कोहली
D. सुरेश रैना


Click for answer

B.अजिंक्‍य रहाणे

इंग्लंड दौऱ्यापूर्वीच्या सरावासाठी सरेकडून इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळण्यास विराट कोहली जाणार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करणार आहे.

7. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. शशी थरूर यांनी कॉंग्रेसच्या कार्यकाळात केंद्रात कोणत्या पदावर काम केले ?

A. राज्यमंत्री, मानव संसाधन विकास
B. राज्यमंत्री, परराष्ट्र व्यवहार
C. A आणि B
D. वरीलपैकी कोणतेही नाही


Click for answer

C. A आणि B

8. अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था 2020 मध्ये मंगळावर लहान हेलिकॉप्टर पाठवणार असून ते निर्मनुष्य ड्रोन सारखे असणार आहे. मंगळाच्या संशोधनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. ह्या उपकरणाचे नाव काय असणार आहे ?

A. दी मार्स हेलिकॉप्टर
B. दि. मार्स लॅण्ड रोव्हर
C. फिनिक्स
D. पाथफायंडर


Click for answer

A. दी मार्स हेलिकॉप्टर

9. ‘मिशन शौर्य’अंतर्गत कोणत्या जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर केले ?

A. नंदुरबार
B. अमरावती
C. चंद्रपूर
D. गडचिरोली


Click for answer

C. चंद्रपूर

मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपूर, जिल्हा प्रशासन चंद्रपूर आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटक व धाडसीपणाला साद घालत ‘मिशन शौर्य’ची आखणी केली होती.

10. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा कोणता पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे ?

A. जनता दल युनायटेड
B. जनता दल सेक्यूलर
C. राष्ट्रीय जनता दल
D. जन मोर्चा


Click for answer

B. जनता दल सेक्यूलर
Read More »