Wednesday, July 30, 2014

मनोगत

गेले काही दिवस आमचे पोस्टस नियमित नव्हते. मध्यंतरी आम्ही नियमितपणे हा ब्लॉग अपडेट करू हे जाहीर ही केले परंतु कृतीत मात्र आम्ही कमी पडलो.

खर सांगायचे तर आम्ही स्वत: तयार केलेल्या मानकांनुसार (standard) नुसार सर्व काही व्यवस्थित सुरु होते. पण आम्ही समाधानी मात्र नक्कीच नव्हतो.

परीक्षार्थ्यांना उपयुक्त अजून काही देता येईल का? यावर विचारमंथन करावे आणि काही तरी सकस करू शकत असल्याची खात्री पटल्याशिवाय परत येवू नये, यासाठी हा अल्पविराम गरजेचा होता.
आता आम्ही काय आणत आहोत आणि त्याचा फायदा होईल किंवा कसे ते तुम्हीच ठरवा.
फक्त यापुढे ह्या ब्लॉगचे स्वरूप पूर्वीपेक्षा जास्त व्यापक आणि उपयुक्त होत आहे याची नोंद घ्या.
आणि हो यापुढे हा ब्लॉग थोडा अनियमितपणे चालवला जाईल. म्हणजे एखादा दिवस वाटले तर आम्ही दांडी मारू, परंतु बहुतांश वेळेस एकाच दिवसात हा ब्लॉग तीन/चार वेळेसही अपडेट होईल.
त्यामुळे सर्व पोस्ट्स चा "ट्रॅक" ठेवत राहा.
नवीन स्वरुपाची जास्त चर्चा आजच करत नाही, ते आपण प्रत्यक्ष पहालच !! चालू घडामोडी आणि इतर घटकांसोबत गणित विषयाविषयी खूप सारी पोस्टस आपणाला पाहायला नक्की मिळतील. या शिवाय यापुढे इंग्रजीतून ही काही पोस्ट्स नियमित पहावयास मिळतील.

अर्थात आमच्या आजवरच्या चाहत्यांव्यतिरिक्त नव्याने ज्यांना हे संकेतस्थळ आवडले त्यांच्या सोयीसाठी हे केले जात आहे. पण हे करताना आमच्या जुन्या वाचकांना त्यांना हव्या असलेल्या माहितीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.