Sunday, October 7, 2012

प्रश्नमंजुषा -290


चालू घडामोडी विशेष-7
STI Mains Special-19

1. 'गॉड पार्टीकल' चे दुसरे नाव काय आहे ?

A. फोटॉन कण
B. हिग्ज-बोसॉन कण
C. आईनस्टाईन कण
D. पॉझीट्रॉन कण

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. हिग्ज-बोसॉन कण
2. 'हिग्ज-बोसॉन' कण ज्यांच्या नावावर नामकरण झालेत त्यापैकी 'बोसॉन' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाच्या संदर्भात आहे ?

A. एन्‍रीको फर्मी
B. जगदीशचंद्र बोस
C. सत्येंद्रनाथ बोस
D. सुभाषचंद्र बोस

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. सत्येंद्रनाथ बोस
3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 'भूकबळी' च्या संदर्भात कोणत्या राज्याकडून रिपोर्ट मागवला आहे ?

A. महाराष्ट्र
B. झारखंड
C. छत्तीसगढ
D. पश्चिम बंगाल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. पश्चिम बंगाल
4. 'सेनकाकू बेटां' संदर्भात कोणत्या दोन देशात वाद सुरु आहेत ?

A. चीन आणि जपान
B. जपान आणि अमेरीका
C. चीन आणि द. कोरीया
D. उ.कोरीया आणि द.कोरीया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. चीन आणि जपान
5. 'दूरसंचार धोरण 2012' हे भारत सरकारने पुढील किती वर्षाकरीताचे धोरण म्हणून मान्य केले ?

A. 5 वर्ष
B. 7 वर्ष
C. 10 वर्ष
D. 25 वर्ष

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. 10 वर्ष
6. फोर्ब्स मासीकाने जाहीर केलेल्या जगातील 100 शक्तीशाली महिलांच्या यादीत अग्रस्थानी कोण आहेत ?

A. अँजेला मर्केल
B. सोनिया गांधी
C. हिलरी क्लिंटन
D. मिशेल ओबामा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. अँजेला मर्केल
7. प्रादेशिक सेना (टेरोटोरियल आर्मी) मधील अधिकारी म्हणून कोणत्या केंद्रीय मंत्र्याला नियुक्त करण्यात आले ?

A. ज्योतीरादित्य शिंदे
B. ए. के.अँटनी
C. सचिन पायलट
D. जयराम रमेश

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. सचिन पायलट स्पष्टीकरण : हा बहुमान मिळविणारे ते पहिले केंद्रीय मंत्री आहेत.
8. भारतीय अंतराळ संस्था(ISRO) चे 100 वे उड्डाण कोणत्या प्रक्षेपकाच्या साह्याने यशस्वीपणे पार पडले ?

A. PSLV-C21
B. GSLV-F04
C. GSLV-Mk III
D. PSLV-C18

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. PSLV-C21
9. 'जेम्स बॉंण्ड' चे पन्नाशीत पदार्पण झाले. त्या निमीत्ताने कोणता दिवस 'जेम्स बॉंण्ड डे ' म्हणून साजरा केला गेला ?

A. 5 ऑक्टोबर
B. 5 नोव्हेंबर
C. 5 डिसेंबर
D. यापैकी नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. 5 ऑक्टोबर
10. ___________ यांच्या पुढाकाराने 'युनिसेफ' ने चंद्रपूर, यवतमाळ या आदिवासी जिल्ह्यात गणित, विज्ञान व एकूण शिक्षणात जिवंतपणा आणला, समाजाचा सहभाग वाढवला.

A. प्रकाश आमटे
B. विद्या बाळ
C. विजया चौहान
D. अनुताई वाघ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. विजया चौहान

प्रश्नमंजुषा -289


चालू घडामोडी विशेष-6
महिला व बालकल्याण -17
STI Mains Special-18

1. खालीलपैकी कोणत्या देशाने अद्यापपर्यंत चंद्रावर मानव पाठविलेला नाही ?

A. भारत
B. चीन
C. अमेरीका
D. रशिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. भारत
2. भारताच्या कोणत्या राज्यात प्लॅटीनमच्या 5 खाणी मिळाल्या आहेत ?

A. उत्तराखंड
B. राजस्थान
C. छत्तीसगढ
D. झारखण्ड

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. झारखण्ड
3. खालीलपैकी कोणत्या देशाने प्रायोगिक तत्त्वावर 3-D टेलीव्हीजन प्रक्षेपण सुरु केले आहे ?

A. अमेरीका
B. चीन
C. जर्मनी
D. जपान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. चीन
4. भारतात सर्वप्रथम वायरलेस ब्रॉडबॅण्ड वर 4-G सेवांची सुरुवात कोणत्या कंपनीने केली ?

A. व्होडाफोन
B. एअरटेल
C. टेलीनॉर
D. बी.एस.एन.एल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. एअरटेल
5. विलासराव देशमुखांच्या मृत्यूनंतर ते सांभाळत असलेले 'भू विज्ञान' आणि 'विज्ञान व तंत्रज्ञान' या खात्यांची जबाबदारी कोणत्या केंद्रीय मंत्र्याला देण्यात आली ?

A. मनमोहन सिंग
B. सुशीलकुमार शिंदे
C. ज्योतिरादित्य शिंदे
D. वायलर रवी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. वायलर रवी
6. लोकसभेच्या सभापती मीरा कुमार ह्या राजकारणात सक्रीय होण्यापूर्वी कोणत्या भारतीय सेवेत होत्या ?

A. भारतीय वन सेवा (IFS)
B. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
C. भारतीय विदेश सेवा (IFS)
D. भारतीय आर्थिक सेवा (IES)

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. भारतीय विदेश सेवा (IFS)
7. चीनची पहिली महिला अंतराळयात्री 'ली यंग' हिने कोणत्या यानातून प्रवास केला?

A. टीनलियान(Tianlian)
B. शेनझाऊ-9(Shenzhou-9)
C. शेनझाऊ-1(Shenzhou-1)
D. वरील पैकी एकही पर्याय बरोबर नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. शेनझाऊ-9
8. केंद्र सरकारने 'क्रीप्टोलॉजी संशोधन केंद्रा' च्या स्थापनेस मंजुरी दिली आहे . हे संशोधन केंद्र कोणत्या शहरात उभे राहणार आहे ?

A. चेन्नई
B. बंगळूरू
C. कोलकता
D. मुंबई

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. कोलकता
9. अमेरिकेच्या टाइम वृत्तपत्रातने भारतीय पंतप्रधानांच्या प्रतिमेसोबत कोणता शब्दप्रयोग वापरला ज्यामुळे 'टाइम' वर टीकेची झोड उठली ?

A. द ओव्हरपरफॉर्मर
B. द अण्डर एचीवर
C. द सायलेन्स पर्सन
D. यापैकी नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. द अण्डर एचीवर
10. 'कुलनदेई फ्रान्सीस(Kulandei Francis)' यांना यावर्षीच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले, ते कोणत्या राज्याशी संबंधित आहेत ?

A. मध्यप्रदेश
B. केरळ
C. ओडीसा
D. तामीळनाडू

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. तामीळनाडू

Friday, October 5, 2012

प्रश्नमंजुषा -288


चालू घडामोडी विशेष-5
महिला व बालकल्याण -16
STI Mains Special-17

1. लंडन ऑलम्पिक 2012 चा विचार करता खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

A. मॅच फिक्सिंगच्या आरोपांवरून बॅडमिंटनमधील आठ खेळाडूंना अपात्र जाहीर केले गेले.
B. लंडन ऑलम्पिक 2012 मध्ये वापरलेले शुभंकर ‘ वेनलॉक ’ आणि ‘ मेण्डेविले ’ यांचा वापर यापुर्वी लंडन पॅरा- ऑलम्पिक्स स्पर्धेदरम्यान ही केला होता .
C. भारतीय संगीतकार ए. आर. रहमान आणि इलैया राजा यांनी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान पंजाबी गीत प्रस्तुत केले .
D. एका सुवर्णपदकासह भारताने एकूण सहा पदक जिंकले.

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. एका सुवर्णपदकासह भारताने एकूण सहा पदक जिंकले.
2. लंडन येथे संपन्न झालेल्या 30 व्या ऑलम्पिक्स नंतर पुढील ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी व कुठे होणार आहेत?

A. 2015,रियो (ब्राझील)
B. 2016, रियो (ब्राझील)
C. 2015, मॉस्को (रशिया)
D. 2016, मॉस्को (रशिया)

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. 2016, रियो (ब्राझील)
3. लंडन ऑलम्पिक्स स्पर्धेत भारतातर्फे कोणत्या दोन खेळाडूंना रजतपदक (Silver Medal) प्राप्त झाले?

A. गगन नारंग (10 मी एअर रायफल), विजय कुमार (20 मी रॅपिडफायर पिस्तोल)
B. गगन नारंग (10 मी एअर रायफल), सायना नेहवाल (बॅडमिंन्टन)
C. विजय कुमार (20 मी रॅपिडफायर पिस्तोल) , मेरी कोम (महिला-बॉक्सींग 51 kg )
D. मेरी कोम (महिला-बॉक्सींग 51 kg), सुशीलकुमार (66 kg कुस्ती)

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. गगन नारंग (10 मी एअर रायफल), विजय कुमार (20 मी रॅपिडफायर पिस्तोल)
4. लंडन ऑलंपिकमध्ये भारताने एकूण किती पदकांची कमाई केली ?
A. 1 सुवर्ण, 2 रजत, 3 कांस्य : एकूण 6
B. 0 सुवर्ण, 2 रजत, 4 कांस्य : एकूण 6
C. 0 सुवर्ण, 3 रजत, 3 कांस्य : एकूण 6
D. 0 सुवर्ण, 2 रजत, 3 कांस्य : एकूण 5

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. 0 सुवर्ण, 2 रजत, 4 कांस्य : एकूण 6
5. लंडन ऑलंपिक 2012 मध्ये भारताचे अंतिम पदतालीकेतील स्थान कितवे आहे ?

A. 40 वे
B. 50 वे
C. 55 वे
D. 65 वे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. 55 वे
6. लंडन ऑलंपिक 2012 मधील पहिल्या 4 पदकविजेत्या देशांचा उतरत्या क्रमाने योग्य क्रम कोणता?

A. अमेरीका - चीन - ब्रिटन - रशिया
B. चीन - अमेरीका - - रशिया - ब्रिटन
C. चीन - रशिया - ब्रिटन - अमेरीका
D. अमेरीका - ब्रिटन - चीन - रशिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. अमेरीका - चीन - ब्रिटन - रशिया
7. 'ऑपरेशन ऑक्टोपस' काय आहे / होते ?

A. भारतीय नौदलाची किनारी सुरक्षे विषयी विशेष मोहीम.
B. झारखंड आणि छत्तीसगढ राज्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी पेरलेले सुरुंग काढण्यासाठी दोन्ही राज्याच्या पोलीस दलांनी संयुक्तपणे चालवलेले अभियान.
C. भारत, पाकीस्तान, बांगलादेश यांचा एकत्रितपणे आरमारी सराव.
D. जलचर प्राण्यांतील नामशेष होत चाललेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी संयुक्त संघाने सुरु केलेले विशेष अभियान .

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. झारखंड आणि छत्तीसगढ राज्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी पेरलेले सुरुंग काढण्यासाठी दोन्ही राज्याच्या पोलीस दलांनी संयुक्तपणे चालवलेले अभियान.
8. भारतातील कोणते राज्य 2012 हे वर्ष 'बालिका वर्ष' म्हणून साजरे करणार आहे ?

A. महाराष्ट्र
B. झारखंड
C. उत्तरप्रदेश
D. राजस्थान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. झारखंड
9. केंद्राने भोपाळच्या दुर्घटनाग्रस्त 'युनियन कार्बाईड' च्या प्रकल्पातील जमा झालेला विषारी कचरा कोणत्या देशात नष्ट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे?

A. बांगलादेश
B. जपान
C. कॅनडा
D. जर्मनी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. जर्मनी
10. केंद्र सरकारच्या आतंकवाद विरोधी मोहिमेचा भाग म्हणून NCTC च्या स्थापनेला काही राज्यांनी नापसंती दर्शविली आहे . NCTC चे पूर्ण रूप काय आहे ?

A. National Council For Terrorism Counter
B. National Council of Terrorism Counter
C. National Counter Terrorism Center
D. National Complete Terrorism (Termination) Center

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. National Counter Terrorism Center

Thursday, October 4, 2012

प्रश्नमंजुषा -287


चालू घडामोडी विशेष-4
महिला व बालकल्याण -15
STI Mains Special-16

1. कुष्ठरोग हा ___________ रोग आहे .

A. जीवाणूजन्य
B. विषाणूजन्य
C. संसर्गजन्य
D. वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही.

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. जीवाणूजन्य
2. भारत सरकारने 1955 मध्ये 'राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमा' चे कोणत्या वर्षी M.D.T (Multi Drug Therapy) वर आधारीत 'राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा' मध्ये रूपांतरण करण्यात आले?

A. 1965
B. 1975
C. 1983
D. 1990

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. 1983
3. राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 च्या उद्दिष्टांनुसार कोणत्या वर्षा पर्यंत कुष्ठरोग हद्दपार करण्याचे उद्दीष्ट होते ?

A. 2005
B. 2007
C. 2010
D. 2012

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 2005
4. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत(Universal Immunization Program) खालीलपैकी कोणत्या रोगांविरुद्ध लसीकरण भारत सरकार करते ?

A. क्षय, मलेरीया, विषमज्वर, गोवर, धनुर्वात, पोलीयो
B. क्षय, घटसर्फ, गोवर, धनुर्वात, पोलीयो, डांग्या खोकला
C. मलेरीया, घटसर्फ, गोवर, धनुर्वात, डांग्या खोकला, विषमज्वर
D. मलेरीया, घटसर्फ, पोलीयो, गोवर, विषमज्वर, डांग्या खोकला

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. क्षय, घटसर्फ, गोवर, धनुर्वात, पोलीयो, डांग्या खोकला
5. राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान 'मिशन पूर्ण शक्ती' ची सुरुवात केव्हा झाली ?

A. 1 जानेवारी 2010
B. 8 मार्च 2010
C. 1 एप्रिल 2010
D. 14 नोव्हेंबर 2010

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. 8 मार्च 2010
6. उत्तरप्रदेश व बिहारमधील काही जिल्ह्यात प्रायोगीक तत्त्वावरील ' मध्य - गंगा मैदानातील महिला सबलीकरण व उपजिवीका कार्यक्रम कोणत्या नावाने ओळखला जातो ?

A. सबला
B. प्रियदर्शनी
C. राजमाता
D. साधार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. प्रियदर्शनी
7. प्रियदर्शनी कार्यक्रम ___________ या संस्थेच्या मदतीने चालविला जात असून ____________ ही संस्था या योजनेची प्रमुख कार्यक्रम संस्था (Lead Programme Agency) म्हणून कार्य पहात आहे.

A. जागतिक बँक(World Bank),महिला व बालकल्याण मंत्रालय
B. आंतरराष्ट्रीय नाणे निधी(IMF),नाबार्ड
C. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी(IFAD),नाबार्ड
D. जागतिक बँक, राष्ट्रीय महिला आयोग

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी(IFAD),नाबार्ड
8. 2003 च्या 'राष्ट्रीय युवा धोरणा' नुसार युवकाची व्याख्या काय ?

A. 15 ते 40 वर्षे वय
B. 13 ते 35 वर्षे वय
C. 15 ते 35 वर्षे वय
D. 20 ते 40 वर्षे वय

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. 13 ते 35 वर्षे वय
9. 'मसुदा राष्ट्रीय युवा धोरण, 2011' (Draft National Youth Policy, 2011) हे धोरण कोणी तयार केले आहे ?

A. युवक कल्याण मंत्रालय
B. नियोजन आयोग
C. आय आय एम, अहमदाबाद
D. राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था
10. दुःखी गरजू मुलांसाठी असलेली चोवीस तास मोफत आपत्कालीन दूरध्वनी सेवा (1098) कोणत्या नावानेही ओळखली जाते ?

A. चाईल्ड-हेल्प सेवा
B. चाईल्ड-लाईन सेवा
C. चाईल्ड-टेलीफोन सेवा
D. चाईल्ड-फ्रेंड सेवा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. चाईल्ड-लाईन सेवा

Wednesday, October 3, 2012

प्रश्नमंजुषा -286


चालू घडामोडी विशेष-3
महिला व बालकल्याण -14
STI Mains Special-15

1. 'भारतीय शहरांतील मुसलमान' (Muslim in India Cities) ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे ?

A. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
B. सलमान रश्दी
C. हमीद अन्सारी
D. झाकीर हुसेन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. हमीद अन्सारी
स्पष्टीकरण : उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी लिहिलेल्या Muslim in India Cities ह्या ग्रंथाचे अनावरण सप्टेंबर 2012 मध्ये झाले .
2. 'Matters of Discretion : An autobiography' (मॅटर्स ऑफ डीस्क्रेशन : एक आत्मवृत्त) हे कोणत्या भारतीय पंतप्रधानाचे आत्मचरीत्र आहे ?

A. व्ही.पी.सिंग
B. इंदीरा गांधी
C. पी. व्ही. नरसिंहराव
D. इंदरकुमार गुजराल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. इंदरकुमार गुजराल
3. अलीकडेच कोणत्या मुख्यमंत्र्याचे 'हवामान' या विषयावर पुस्तक प्रकाशित झाले ?

A. ममता बॅनर्जी
B. नितीश कुमार
C. तरुण गोगाई
D. नरेंद्र मोदी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. नरेंद्र मोदी
स्पष्टीकरण : नरेंद्र मोदी यांचे 'Convenient Action - Gujarat's Response to Challenges of Climate Change' अर्थात हवामान बदलावर गुजरात राज्याने घेतलेल्या उपाययोजनांवर भाष्य करणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे .
4. जागतिक शांतता दिन कधी साजरा झाला ?

A. 2 सप्टेंबर
B. 12 सप्टेंबर
C. 21 सप्टेंबर
D. 25 सप्टेंबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. 21 सप्टेंबर
5. 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट मधील आशीया कपाचा ( Under-19 Asia Cup ) 2012 चा विजेता देश कोणता ?
A. भारत
B. पाकीस्तान
C. श्रीलंका
D. भारत-पाकीस्तान संयुक्तपणे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. भारत-पाकीस्तान संयुक्तपणे
6. 2012 चा आय.सी.सी. चा 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेटचे (Under-19 ICC World Cup) जागतिक चषकाचे विजेतेपद कोणत्या देशास मिळाले ?

A. ऑस्ट्रेलिया
B. भारत
C. पाकीस्तान
D. श्रीलंका

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. भारत
7. 2012 चा क्रिकेटमधील आय सी सी चा अंडर -19 वर्ल्ड कप स्पर्धा कोणत्या देशात पार पडली ?

A. भारत
B. श्रीलंका
C. ऑस्ट्रेलिया
D. पाकीस्तान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. ऑस्ट्रेलिया
8. भारताने अंडर 19 -आय.सी.सी.क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा आजतागायत किती वेळा जिंकली आहे ?

A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. तीन
9. 2012 च्या अंडर 19 - आय.सी.सी. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व खालीलपैकी कोणी केले ?

A. संदीप शर्मा
B. हरमीत सिंग
C. बाबा अपराजीत
D. उन्मुक्त चांद

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. उन्मुक्त चांद
10. खालीलपैकी कोणी ' अंडर 19 -आय.सी.सी. क्रिकेट वर्ल्ड कप ' मधील जागतिक विजेतेपद प्राप्त केलेल्या संघाचे केलेले नाही ?

A. उन्मुक्त चांद
B. विराट कोहली
C. युवराज सिंग
D. मोहम्मद कैफ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. युवराज सिंग

Tuesday, October 2, 2012

मागोवा - 24 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2012


 • माजी विधानसभा अध्यक्ष श्री कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर यांचे निधन .
  • कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी या गावाच्या सरपंच पदावरून राजकीय कारर्किदीची सुरुवात .
  • कोल्हापूर जि. प. वर काम पाहीले .
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार .
  • गडहिंग्लज मतदारसंघातून .
  • 2005 साली विधानसभा अध्यक्ष.
  • राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहीले .
 • .

 • प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन .
  • चित्रपट: चौकट राजा , आनंदाचं झाड , सातच्या आत घरात , तू तिथं मी .
   ' सुखान्त ' हा त्यांचा चित्रपट इच्छामरणाचा विषय हाताळणारा होता .
  • मालीका: अवंतिका , सुकन्या .
  • .

 • हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी , थोर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ताराबाई परांजपे यांचे निधन .

 • उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांचा राजीनामा .
  अजित पवार यांनी वित्त व नियोजन मंत्री आणि ऊर्जामंत्री पदाचाही राजीनामा दिला .










 • भारताच्या 39 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती अल्तमश कबीर यांची नियुक्ती .



  • या पूर्वी झारखंड आणि कोलकता या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्तीपद त्यांनी भूषविले .
  • न्यायमूर्ती एस. एच. कपाडिया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले त्या जागी कबीर यांची नियुक्ती करण्यात आली .

 • 27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन .

 • विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री: सी. पी. जोशी
 • केंद्रीय अर्थमंत्री: पी. चिदंबरम

 • मुंबई महानगरपालिका स्वतः 20 MW क्षमतेचा विद्युतनिर्मीती प्रकल्प उभा करणार आहे . मोरबे धरणाच्या 100 एकर जमीनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे .

 • केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ( CBI ) 1993 पासूनच्या कोळसा खाण वाटपाची चौकशी करणार.

 • राज्यात 4 हजार 637 ग्रामपंचायतीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार.

 • भारताचा आजतागायताचा सर्वात जास्त ( 3 हजार 400 किलो ) वजनाच्या GSAT - 10 ह्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण .
  • ' गगन ' साठी हा उपग्रह उपयुक्त असेल . शिवाय - प्रगत दळणवळणासाठी उपयोगी
  • दक्षिण अमेरिकेतील ' फ्रेंच गियाना ' इथल्या युरोपीय प्रक्षेपण तळावरून तो प्रक्षेपित करण्यात आला .


   



 • राष्ट्रीय व्यवस्थापन परिषद मुंबईत संपन्न.




 • चोवीसावे ' अखिल भारतीय मराठी बालकुमार साहीत्य संमेलन ' डिसेंबर 2012 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी ता. राजापूर येथे होणार आहे .



 • संयुक्त राष्ट्र संघटनेचे ' जैवविविधता ' ( Biodiversity ) ह्या विषयावरील जागतिक परिसंवाद हैदराबादेत संपन्न .

  • केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री :जयंती नटराजन



 • राज्यात 2 ऑक्टोबर 2012 ते 31 ऑक्टोबर 2012 या कालवधीत ' महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जागृती अभियान ' राबविले जाणार .

  • स्वयंपूर्ण ग्राम राज्याची उभारणी हा महात्मा गांधीचा संकल्प होता . त्या दृष्टीने हे अभियान राबविले जाणार आहे .

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती .



 •   सत्ताविसावा ' इंदीरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ' कवी गुलजार यांना जाहीर . 31 ऑक्टोबरला म्हणजे इंदीरा गांधींच्या स्मृतीदिनी तो त्यांना प्रदान केला जाईल


 • प्रश्नमंजुषा -285


  STI Mains Special-14

  1. खालीलपैकी कोणते व्यंजन ' महाप्राण ' म्हणून संबोधले जाते ?

  A. ग्
  B. त्
  C. ह्
  D. प्

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  C. ह्
  2. खालीलपैकी कोणता वर्ण 'मूर्धन्य' नाही ?

  A. म्
  B. त्
  C. ठ्
  D. ड्

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  A. म्
  3. ' विजय निबंध लिहतो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

  A. कर्मणी
  B. कर्तरी
  C. भावे
  D. कर्मकर्तरी

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  B. कर्तरी
  4. 'शिपायाने चोरास पकडले' प्रयोग ओळखा .

  A. कर्मणी
  B. भावे
  C. कर्मभावसंकर
  D. कर्तरी

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  B. भावे
  5. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा 'ते गाणे गातात'.

  A. कर्तरी प्रयोग
  B. कर्मणी प्रयोग
  C. भावे प्रयोग
  D. भावकर्तरी प्रयोग

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  A. कर्तरी प्रयोग
  6. 'शेळीने गवत खाल्ले' प्रयोग ओळखा .

  A. कर्तरी
  B. कर्मणी
  C. अकर्मक भावे
  D. सकर्मक भावे

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  B. कर्मणी
  7. 'रामाने रावणाला मारले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  A. सकर्मक भावे प्रयोग
  B. अकर्मक भावे प्रयोग
  C. कर्मणी प्रयोग
  D. कर्तरी प्रयोग

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  A. सकर्मक भावे प्रयोग
  8. 'हळद लागणे' ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ दाखविणारा योग्य पर्याय निवडा .

  A. विवाह होणे
  B. कावीळ होणे
  C. संपत्ती येणे
  D. साध्य करणे

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  A. विवाह होणे
  9. 'बेरजेचे राजकारण' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

  A. वजाबाकी नसलेले राजकारण
  B. बेरीज असलेले राजकारण
  C. सर्व जातींना एकत्रित आणणारे राजकारण
  D. सर्वांच्या सहमतीने करावयाचे राजकारण

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  D. सर्वांच्या सहमतीने करावयाचे राजकारण
  10. 'प्रारंभ करणे' या अर्थाशी विसंगत वाक्प्रचार ओळखा .

  A. पाया घालणे
  B. इतिश्री करणे
  C. मुहूर्तमेढ रोवणे
  D. श्रीगणेशा करणे

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  B. इतिश्री करणे

  Monday, October 1, 2012

  प्रश्नमंजुषा -284


  STI Mains Special-13

  1. भारत सरकारला कोणत्या वर्षी स्वतःकडचे सोने 'IMF' आणि 'युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड'कडे तारण ठेवण्याची नामुष्की सहन करावी लागली ?

  A. 2007
  B. 2001
  C. 1995
  D. 1991

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  D. 1991
  2. भारत सरकारने 2009 साली आंतरराष्ट्रीय नाणे निधी ( IMF) विकत असलेल्या 403.3 टन सोन्यापैकी किती सोने विकत घेतले ?

  A. 4 टन
  B. 40 टन
  C. 20 टन
  D. 200 टन

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  D. 200 टन
  3. डिसेंबर 2010 अखेर भारत जगातील सर्वाधीक परकीय चलन साठा असलेला ___________ क्रमांकाचा देश ठरला.

  A. दहावा
  B. आठवा
  C. चौथा
  D. तिसरा

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  C. चौथा
  4. डिसेंबर 2010 चा विचार करता भारत जगातील __________ क्रमांकाचा सरकारी सोने धारण करणारा ( official gold holding country ) बनला .

  A. पहिला
  B. पाचवा
  C. दहावा
  D. पन्नासवा

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  C. दहावा
  5. IMF मधील SDR चा विचार करता भारताचा जगातील SDR कोटा धारकांमधील कितवा क्रमांक आहे ?

  A. 7 वा
  B. 13 वा
  C. 27 वा
  D. 57 वा

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  B. 13 वा
  6. SDR चा भारताचा हिस्सा जागतिक हिश्श्यापैकी किती टक्के आहे ?

  A. 0.8 %
  B. 1.0 %
  C. 1.91 %
  D. 5 %

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  C. 1.91 %
  7. SDR ची किंमत कोणत्या/कोणकोणत्या चलनांच्या संदर्भात मोजली जाते ?

  A. भारतीय रुपया,डॉलर,पाऊंड
  B. डॉलर,पाऊंड,येन,भारतीय रुपया
  C. फक्त डॉलर
  D. डॉलर,पाऊंड,येन,मार्क,फ्रँक

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  D. डॉलर,पाऊंड,येन,मार्क,फ्रँक
  8. राजकोषीय तूट या संकल्पनेचा वापर भारत सरकारने कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पापासून सुरु केला ?

  A. 1992-1993
  B. 1995-1996
  C. 1999-2000
  D. 2005-2006

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  A. 1992-1993
  9. 'सर्व शिक्षा अभियान' कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यान कार्यान्वीत करण्यात आले?

  A. आठवी
  B. नववी
  C. दहावी
  D. अकरावी

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  B. नववी
  10. पेन्शन न मिळणार्‍या‍ ज्येष्ठ नागरीकांना अन्नधान्य पुरवठयासाठी मार्च 1999 मध्ये भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना सुरु केली ?

  A. राजराजेश्वरी योजना
  B. स्वावलंबन योजना
  C. अन्नपूर्णा योजना
  D. स्वाधार योजना

  उत्तरासाठी येथे क्लिक करा.
  C. अन्नपूर्णा योजना

  Follow us by Email Absolutely FREE

  Share for Care

  If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
  आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
  You can share the links to this blog.

  हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत