Saturday, December 8, 2012

प्रश्नमंजुषा- 8 डिसेंबर 2012


प्रश्नमंजुषा -323
1. 25 सप्टेंबर 2012च्या निर्णयानुसार कोणत्या कंपनीतील सरकारचा वर्तमान हिस्सा 0.0000011% वरून 55.57% करायला सेबी(SEBI) ने मान्यता दिली आहे.म्हणजेच पर्यायाने ह्या कंपनीला सरकारी उद्योगाचा दर्जा प्राप्त होईल ?

A. IDBI
B. IFCI
C. FCCI
D. NABARD

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. IFCI
IFCI :इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया लिमिटेड
2. प्रकृती आणि संस्कृतीला असलेला संभाव्य धोखा विचारात घेवून कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 503 मेगावॉट क्षमतेचे 4 प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द केले ?

A. मध्यप्रदेश
B. तामीळनाडू
C. हिमाचल प्रदेश
D. आसाम

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. हिमाचल प्रदेश
3. 'थ्री डिकेडस् इन पार्लमेंट' हा कोणत्या राजनेत्याच्या भाषणांचा संग्रह आहे ?

A. इंदरकुमार गुजराल
B. प्रणव मुखर्जी
C. अटलबिहारी वाजपेयी
D. शरद पवार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. अटलबिहारी वाजपेयी
4. 2012 चे 'शांततेचे' नोबेल परितोषिक 'युरोपियन युनियन' ला प्राप्त झाले. यापूर्वीचे 'शांततेचे' नोबेल परितोषिक बहाल केले गेलेल्या संस्थांमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या संस्थांचा समावेश आहे ?
I.आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस
II. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स
III. संयुक्त राष्ट्र संघटना(UN)
IV. विश्व पर्यावरण परिषद
V. एमनेस्टी इंटरनॅशनल

A. I,II,IV,V
B. I,II,III
C. I,II,IV,V
D. वरील सर्व

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. वरील सर्व
5. ग्रामीण भागातील 'आशा' ह्या आरोग्य सेविकांच्या धर्तीवर शहरी भागातील गरिबांना आरोग्य सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी कोणत्या नावाने आरोग्य सेविका तैनात करण्यात येणार आहेत ?

A. सुधारित आशा
B. उषा
C. दिशा
D. सिस्टर्स

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. उषा
उषा : Urban Social Health Activist
6. डिसेंबर 2012 अखेर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अस्थायी सदस्य म्हणून भारतासह 5 राष्ट्रांचा 2 वर्षांचा कार्यकाळ संपतो आहे. त्यांची जागा 1 जानेवारी 2013 पासून खालीलपैकी कोणता राष्ट्रसमुह घेणार आहे ?

A. चीन, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटीना, बेल्जियम आणि सुदान
B. दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटीना, बेल्जियम आणि सुदान
C. उत्तर कोरिया, ऑस्ट्रेलिया, पेरू, स्वित्झर्लंड आणि सुदान
D. रवांडा, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटीना, लक्झमबर्ग आणि दक्षिण कोरिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. रवांडा, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटीना, लक्झमबर्ग आणि दक्षिण कोरिया
7. UPA सरकारचे महत्त्वाकांक्षी असे 'अन्न सुरक्षा विधेयक 2011' लोकसभेत कोणी सादर केले होते ?

A. मनमोहन सिंग
B. कपिल सिब्बल
C. शरद पवार
D. के.व्ही.थॉमस

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. के.व्ही.थॉमस
के.व्ही.थॉमस हे अन्नमंत्री(Food Minister) आहेत.
8. 22 मार्च 2012 रोजी कोणत्या राज्याने स्वत:चा स्थापनेचा 'शतक महोत्सव' साजरा केला ?

A. राजस्थान
B. आसाम
C. आंध्रप्रदेश
D. बिहार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. बिहार
9. तामीळनाडूची विधानपरिषद अद्यापही अधांतरी असल्यामुळे सध्या केवळ 6 राज्यात-जम्मू आणि काश्मीर,बिहार,महाराष्ट्र ,कर्नाटक,आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश विधानपरिषद अस्तित्वात आहे.मात्र अलीकडेच एका राज्यात मुख्यमंत्र्यांनी तेथील सभागृह ही द्वी-सदनी करण्याची म्हणजे विधानपरिषद स्थापन करण्याची घोषणा केली. ते राज्य कोणते ?

A. राजस्थान
B. गुजरात
C. आसाम
D. पश्चिम बंगाल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. राजस्थान
10. गाडगेबाबांची समाधी कोठे आहे ?

A. अकोला
B. अमरावती
C. नागपूर
D. कोल्हापूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. अमरावती