Wednesday, December 5, 2012

प्रश्नमंजुषा -322

1. मूळ भारतीय असलेल्या विक्रम पंडित यांनी सिटीग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा आणि संचालक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी कोणाची नेमणूक संचालक मंडळाने केली ?

A. मायकेल कोरबॅट
B. रिचर्ड पार्सन्स
C. एंड्रयू कुओमो
D. रिचर्ड एफ़. होल्ट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. मायकेल कोरबॅट
2. अलीकडेच निधन पावलेले इंदर कुमार गुजराल हे भारताचे कितवे पंतप्रधान होते ?

A. दहावे
B. अकरावे
C. बारावे
D. तेरावे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. बारावे
3. आयपॉड आणि आयफोन बनवण्यात अग्रेसर असणाऱ्या अ‍ॅपल कंपनीची पेटंट्स चोरल्याप्रकरणी कोणत्या मोबाईल कंपनीला अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅन जोसे येथील न्यायालयातील ज्युरींनी सुमारे १ अब्ज डॉलर्सचा (अंदाजे साडेपाच हजार कोटी रुपये) दंड ठोठावला आहे ?

A. नोकिया
B. एलजी
C. सॅमसंग
D. मोटोरोला

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. सॅमसंग
4. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणत्या अग्रगण्य कंपनीने आपला लोगो (बोधचिन्ह) अलीकडेच बदलला आहे ?

A. मायक्रोसॉफ्ट
B. गुगल
C. सन माइक्रोसिस्टम्स
D. फेसबुक इंकॉ.

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. मायक्रोसॉफ्ट
मायक्रोसॉफ्टने आपला लोगो (बोधचिन्ह) तब्बल २५ वर्षांनी बदलले आहे.
5. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार २0२0 पर्यंत सर्वात मोठा तेल उत्पादक देश म्हणून सौदी अरेबियाला मागे टाकून कोणता देश ते स्थान घेईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे ?

A. रशिया
B. इराण
C. कुवेत
D. अमेरिका

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. अमेरिका
6. सॅमसंग ही कोणत्या देशातील मोबाईल कंपनी आहे ?

A. दक्षिण कोरिया
B. जपान
C. फिनलंड
D. अमेरिका

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. दक्षिण कोरिया
7. शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींसाठी काम करणाऱ्या स्वतंत्र संस्थेच्या प्रशासकीयपदी अमेरिकेच्या ओबामा प्रशासनाने कोणत्या भारतीय वंशाच्या अंध व्यक्तीची नियुक्ती केली आहे ?

A. सचिन देव पविथरन
B. विशाखा देसाई
C. शुभश्री रमानाथन
D. पवन सिन्हा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. सचिन देव पविथरन
सचिन देव पविथरन यांची आर्किटेक्‍चरल ऍण्ड ट्रान्स्पोर्टेशनल बॅरिअर्स कम्पायन्स बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
8. मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आलेल्या सिंचन श्‍वेतपत्रिकेत राज्यातील सिंचनाचे क्षेत्र किती टक्‍क्‍यांनी वाढल्याचा दावा करण्यात आला आहे ?

A. 0.01%
B. 1.17%
C. 2.57%
D. 5.17%

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. 5.17%
9. राज्याचे जलसंपदामंत्री कोण आहेत ?

A. अजित पवार
B. सुनील तटकरे
C. पृथ्वीराज चव्हाण
D. रामराजे निंबाळकर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. सुनील तटकरे
10. ब्रिटिश नौदलाच्या ताफ्यातील सर्वांत नवी आणि अत्याधुनिक अशा कोणत्या स्टेल्थ विनाशिकाने ने मुंबई बंदराला भेट दिली.

A. विक्रमादित्य
B. रॉयल ब्रिटन
C. एचएमएस डेअरिंग
D. एचएमएस व्हिक्टोरिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. एचएमएस डेअरिंग