Friday, January 20, 2012

प्रश्नमंजुषा -184


1. स्त्री शिक्षणासाठी व स्त्री जागृतीसाठी 'शारदा-सदन' ही संस्था कोणी स्थापन केली ?

A. रमाबाई रानडे
B. पंडिता रमाबाई
C. ताराबाई शिंदे
D. सावित्रीबाई फुले

Click for answer 
B. पंडिता रमाबाई

2.माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने खानदेशचा कलेक्टर म्हणून ______________ यांची नेमणूक केली.

A. एच.डी.रॉबर्टसन
B. कॅ.जॉन ब्रिग्ज
C. विल्यम चॅपलीन
D. हेन्‍री पॉन्टीज

Click for answer 
B. कॅ.जॉन ब्रिग्ज

3. नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांती चळवळीत योगदान दिले ?

A. तुफानी सेना
B. वानर सेना
C. बहुजन सेना
D. मावळ्यांची सेना

Click for answer 
A. तुफानी सेना

4. 1934 मधील 'नागपूर योजना' कशासाठी प्रसिध्द आहे ?

A. नागपूरचा आर्थिक विकास
B. रस्ते बांधकाम
C. रेल्वे विकास
D. जलवाहतूक नियंत्रण

Click for answer 
C. रेल्वे विकास


5. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव कोणते ?

A. सार्वजनिक काका
B. लोकहितवादी
C. भाऊ महाजन
D. भाऊ दाजी लाड

Click for answer 
B. लोकहितवादी

6. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यापाठीमागे महात्मा फुलेंचा मुख्य उद्देश कोणता होता ?

A. इंग्रजांच्या वर्चस्वाला विरोध
B. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध
C. संस्थानिकांच्या वर्चस्वाला विरोध
D. मिशनर्‍यांच्या वर्चस्वाला विरोध

Click for answer 
B. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध

7. महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल ?

A. सेनापती बापट
B. श्रीपाद डांगे
C. लालजी पेंडसे
D. अच्युत पटवर्धन

Click for answer 
B. श्रीपाद डांगे

8. प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली ?

A. कोलकाता
B. चेन्नई
C. मुंबई
D. पुणे

Click for answer 
C. मुंबई

9. मार्च 1927 मध्ये कुलाबा जिल्ह्यात डॉ.आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 'कुलाबा डीस्ट्रीक्ट डिप्रेस्ड क्लासेसची सभा' झाली त्यात __________ हा ठराव कार्यान्वित करण्याचे ठरले.

A. मंदिर प्रवेश
B. महाड तळे
C. बोले ठराव
D. पर्वती प्रवेश

Click for answer 
C. बोले ठराव

10. सावरकर बंधूंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली ?

A. क्रांतीसेना
B. अभिनव भारत
C. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
D. अनुशीलन समिती

Click for answer 
B. अभिनव भारत