Sunday, August 8, 2010

चालू घडामोडी 8 ऑगस्ट 2010

प्रादेशिक 

 • मानव विकास मिशन व जिल्हा परिषद गडचिरोलीच्या शिक्षण विभागामार्फत संयुक्तरित्या ई-विद्या प्रकल्प स्थापन.
 • स्पेन येथील जगविख्यात जिब्राल्टर खाडी पोहणारा पहिला आदिवासी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे.
 • पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेकरिता दरवर्षी किमान 332  कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित .
 • माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे  'महा-आयटी-राष्ट्र' या न्यूज लेटर प्रकाशित. दर महिन्याला प्रसिद्ध होणार्‍या या न्यूज लेटरमध्ये शासनाच्या विविध विभागांनी ई-गव्हर्नन्स क्षेत्रात केलेल्या वैविध्यपूर्ण कामांची माहिती देण्यात येणार.
 • मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय झाले 125 वर्षांचे.
 • वन विभागाने या वर्षी 10  कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
 • पुण्यातील यशदा येथे ग्रामविकास व जलसंधारण विभागाद्वारे आयोजित पंचायत महिला शक्ती अभियान या पंचायत संस्थांमधील निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद अलीकडेच संपन्न.
राष्ट्रीय 
 • तामिळनाडूत मंदिरात श्रद्धाळूंना हत्तीकडून आशिर्वाद देण्यास प्रतिबंध.
 • भारताकडून बांगलादेशला 1 अब्ज अमेरिकन डोल्लरचे कर्ज.
 • भारतातील 75 % काजुंचे उत्पादन केरळात होते.
 • देशातील जंगलांच्या विस्तारीकरणासाठी नियोजित आहे 'ग्रीन इंडिया मिशन' .
 • दूरदर्शन 2013 पर्यंत डीजीटल करण्याची ट्रायची शिफारस पाळू शकणार नाही.
  प्रसारभारती 2017 पर्यंत पूर्णपणे डीजीटल होणार.
  ट्राय- TRAI - टेलीकॉम रेगुलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया
आंतरराष्ट्रीय
 • सागरी सहकार्य परिषद श्रीलंकेत संपन्न. 
 • केनियाने स्वीकारली नवीन राज्यघटना. 
 • जुआन मनुएल सांतोस (Juan Manuel Santos ) कोलोम्बियाचे नवीन अध्यक्ष. 
 • Hewlett Packard या आघाडीच्या software कंपनी चे सि.इ.ओ. मार्क  हुर्ड, यांचा लैंगिक छळवणुकीचे आरोप झाल्यामुळे पदाचा राजीनामा.
विज्ञान तंत्रज्ञान
 • रोबोनाट- २( Robonaut 2 ) हा मानवसदृश्य यंत्रमानव आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दुरुस्तीला मदत करेल शिवाय तो त्याचे अनुभव ट्वीटर वर ट्वीट करेल.