Wednesday, June 17, 2015

MPSC Big change

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यसेवा मुख्य परीक्षेत यापुढे मराठी व इंग्रजी यांचा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपात असेल असे जाहीर केले आहे. शिवाय त्यांचे स्वरूप किमान अर्हता स्वरूपाचे असेल, म्हणजे खरी लढाई ही उरलेल्या चार सामान्य ज्ञानावर आधारित पेपर्स वर आधारित असेल.

गेल्या दोन वर्षात राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा स्तर पाहता, हा निर्णय अतिशय योग्य आहे असे वाटते. मात्र, उमेदवारांना विचारांची सुसूत्रतेपणे विचार करता येतो आणि शिस्तबद्ध मांडणी करता येते याची चाचपणी आयोग कशा प्रकारे करणार आहे, हे गुलदस्त्यात आहे.

mpsc

सविस्तर वाचा...... “MPSC Big change”

Monday, June 15, 2015

99 वी घटनादुरूस्ती

 

 • indian-constitutional-amendment-act
  ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगलादेश यांच्यात भूभागांच्या आदानप्रदान संदर्भात आहे. तर GST चा उल्लेख असलेले 121 वे घटनादुरुस्ती विधेयक केवळ लोकसभेने संमत केलेले असल्याने अद्यापही विधेयक (प्रस्तावित घटनादुरुस्ती) या स्वरूपातच आहे.)
  वास्तविक पाहता हे 121वे घटनादुरूस्ती विधेयक होते. परंतु, काही विधेयके संमत न होता रद्द(Lapsed)होतात, पण संमत झालेली घटनादुरूस्ती ही क्रमाने पुढील क्रमांक धारण करते, म्हणून ही 99 वी घटनादुरूस्ती.
 • राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली 31 डिसेंबर 2014 रोजी. मात्र कायदा अंमलात आला 13 एप्रिल 2015 पासून.
 • ही घटनादुरूस्ती National Judicial Appointment Commission(NJAC) अर्थात राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती कमिशन च्या संदर्भातील आहे.
 • ह्या घटनादुरूस्ती द्वारा राज्यघटनेत 124अ, 124ब, 124क या तीन नवीन कलमांचा समावेश करण्यात आला, तर राज्यघटनेच्या कलम 127, 128, 217, 222, 224अ,231 या कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली.
 • ही घटनादुरूस्ती वास्तवात येण्यापूर्वी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीशांच्या समितीकडून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका तसेच बदल्यांबद्दल शिफारशी राष्ट्रपतींकडे केल्या जात व त्या आधारे निर्णय घेतला जाई. कार्यकारी मंडळाला त्यात स्थान नव्हते.
  मात्र आता घटनादुरूस्तीने हे अधिकार NJAC मिळाले आहेत.
 • 124अ या कलमात NJAC ची रचना (Composition) , 124ब या कलमात NJACची कार्ये (Functions) तर 124क मध्ये NJAC च्या कार्यपद्धती (Power of Parliament to make law on procedures) समावेश करण्यात आला आहे.
 • 124अ  या कलमात नमूद केल्याप्रमाणे NJAC मध्ये भारताचे सरन्यायाधीश (अध्यक्ष) , सर्वोच्च न्यायालयातील अन्य दोन जेष्ठ न्यायाधीश, विधी आणि न्याय मंत्री, दोन प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समावेश असेल.
 • या प्रतिष्ठित व्यक्तींची नेमणूक सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता यांच्या समितीकडून करण्यात येईल.
 • 124ब या कलमात नमूद केल्याप्रमाणे NJAC ची कार्ये पुढील प्रमाणे:
  1. भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयातील अन्य न्यायाधीश आदींच्या नेमणूकांबाबत शिफारस करणे.
  2. उच्च न्यायालयातील मुख्य आणि अन्य न्यायाधीशांच्या बदल्यांबाबत शिफारस करणे.
  3. न्याय व्यवस्थेत सक्षम आणि सचोटीच्या लोकांची शिफारस करणे.
 • अर्थात ह्या घटनादुरुस्तीची वैधता तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठापुढे सद्यस्थितीत सुनावणी सुरु आहे.
सविस्तर वाचा...... “99 वी घटनादुरूस्ती”

Wednesday, June 10, 2015

Current Snippets 10 June 2015

 • राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आलेले सुनील व्यंकटेश मनोहर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 • त्यांचा राजीनामा मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला.
 • या पदाचा अतिरिक्त कार्यभार भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्याकडे देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
 • दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तोमर यांना मंगळवारी दिल्ली पोलिसांनी बोगस डिग्री सादर केल्याप्रकरणी अटक केली आहे.
 • लोकसेवकांविरुद्धच्या चौकशीच्या कार्यवाहीसाठी त्याच्याशी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व संमती आवश्यक करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
 • फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) व कलम १९० मध्ये सुधारणा करुन लोकसेवकांविरुद्धच्या तक्रारींवरील कार्यवाहीबाबत स्पष्ट तरतुदींचा समावेश करण्याच्या निर्णयास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
 • आता दंडाधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या संमतीशिवाय लोकसेवकांच्या चौकशीचे आदेश देता येणार नाहीत.
 • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी प्रमुख के. व्ही. चौधरी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी, तर माहिती आयुक्त विजय शर्मा यांची मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
 • इंडियन बँकेचे अध्यक्ष टी. एम. भसीन यांना दक्षता आयुक्त नेमण्यात आले असून माजी सामाजिक न्याय व सक्षमीकरण आयुक्त सुधीर भार्गव यांना माहिती आयुक्त नेमण्यात आले आहे.
 • के. व्ही. चौधरी- चौधरी यांची नेमणूक केल्याने मुख्य दक्षता आयुक्तपदी प्रथमच आयएएस व्यतिरिक्त अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
 • चौधरी हे आयआरएस म्हणजे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी असून ते सर्वोच्च न्यायालयाने काळ्या पैशाबाबत नेमलेल्या विशेष चौकशी पथकाचे सल्लागार होते.
 • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते ऑक्टोबरमध्ये निवृत्त झाले.
 • चौधरी व भसीन यांची चार वर्षांसाठी नियुक्ती असली तरी 65 वर्षे हे निवृत्तीचे वय लागू राहणार आहे. भार्गव यांना चार वर्षांचा कालावधी मिळणार आहे.
 • बांगलादेशातर्फे तेथील सर्वोच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन रविवारी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना गौरविण्यात आले.
 • वाजपेयी यांच्यावतीने विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा बांगलादेश मुक्ती पुरस्कार स्वीकारला .
 • गेली अनेक शतके चालू असणाऱ्या फिमेल जेनिटल म्युटिलेशन (एफजीएम) म्हणजेच स्त्री जननांग कापण्याच्या विकृत प्रथेवर अखेर सोमवारी नायजेरियाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
 • युनिसेफच्या माहितीनुसार १५ ते ४९ या वयोगटामधील १९.९ दशलक्ष नायजेरियन महिलांना एफजीएचा त्रास सहन करावा लागला होता. अखेर द व्हायोलन्स अगेन्स्ट पर्सन्स (प्रोहिबिशन) अ‍ॅक्ट २०१५ हा कायदा नायजेरियन सिनेटने मंजूर केला आणि नायजेरियाने एफजीएमविरोधात ठाम पाऊल उचलल्याचे सर्व जगाला दाखवून दिले.
 • भारतीय लष्कराने पहिल्यांदाच देशाची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून म्यानमारच्या सीमेत प्रवेश करून भारताविरुद्ध कट रचणा-या दहशतवाद्यांच्या खातमा केला आहे.
 • भारतीय लष्कराचे अशाप्रकारचे हे पहिलेच क्रॉस बॉर्डर ऑपरेशन ठरले
 • नुकत्याच झालेल्या पर्यावरणदिनी भूतान देशाने पर्यावरण दिनानिमित्त ५० हजारbhutan झाडे लावली असून, त्याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली आहे. येथील १०० लोकांनी एका तासात ५० हजार झाडे लावली आहेत. भूतानचे राजे जिग्मे सिग्मे वांगचूक हे पर्यावरणप्रेमी आहेत.
 • तेथील राज्यघटनेनुसार देशातील ६० टक्के भागात वने असलीच पाहिजेत.
सविस्तर वाचा...... “Current Snippets 10 June 2015”

Monday, June 8, 2015

चालू घडामोडी - या घटकावर आधारित Random Question Quiz

पहिल्या दोन प्रश्नसंचाना मिळालेल्या प्रतिसादानंतर हा तिसरा प्रश्नसंच आम्ही आपल्यासमोर आणत आहोत.
ही प्रश्नमंजुषा दर वेळी तुम्ही सुरू कराल तेव्हा वेगळे प्रश्न Randomly निवडून देईल.
तुमची उत्तरे पडताळून पाहण्यासाठी शेवटी असलेल्या 'Check Answers' बटनाला दाबा.
नवीन प्रश्नसंच सोडवण्यासाठी खाली दिलेले 'Take Fresh Quiz' बटन दाबा.
तुम्हाला हा प्रयोग आवडला असल्यास डाव्या बाजूच्या फेसबुक लाईक ला नक्की क्लिक करा. त्यावरून आम्ही इतरही विषयांवर आधारित असे प्रश्नसंच द्यावे किंवा नाही हे ठरवू.
महत्त्वाचे म्हणजे हा प्रयोग तुम्हाला आवडला तर आम्ही येथीलही प्रश्न आणखी वाढवू, म्हणजे तुम्हाला जास्त सराव होईल.

सविस्तर वाचा...... “चालू घडामोडी - या घटकावर आधारित Random Question Quiz”

Wednesday, June 3, 2015

GK Random Quiz – Social Reformers

Random Question GK Quiz मधली आमचा हा दुसरा प्रश्नसंच - आधारित आहे समाजसुधारक या सर्व स्पर्धा परीक्षांमधल्या अतिशय महत्त्वाच्या घटकावर.
ही प्रश्नमंजुषा दर वेळी तुम्ही सुरू कराल तेव्हा वेगळे प्रश्न Randomly निवडून देईल.
तुमची उत्तरे पडताळून पाहण्यासाठी शेवटी असलेल्या 'Check Answers' बटनाला दाबा.
नवीन प्रश्नसंच सोडवण्यासाठी खाली दिलेले 'Take Fresh Quiz' बटन दाबा.
तुम्हाला हा प्रयोग आवडला असल्यास डाव्या बाजूच्या फेसबुक लाईक ला नक्की क्लिक करा. त्यावरून आम्ही इतरही विषयांवर आधारित असे प्रश्नसंच द्यावे किंवा नाही हे ठरवू.
महत्त्वाचे म्हणजे हा प्रयोग तुम्हाला आवडला तर आम्ही येथीलही प्रश्न आणखी वाढवू, म्हणजे तुम्हाला जास्त सराव होईल.

सविस्तर वाचा...... “GK Random Quiz – Social Reformers”

Tuesday, June 2, 2015

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 2 जून 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ( एसटी ) पहिली बस कोणत्या मार्गावर धावली होती ? mpsc

A. मुंबई ते ठाणे
B. अहमदनगर ते पुणे
C. मुंबई ते पुणे
D. कोल्हापूर ते पंढरपूर


Click for answer

B. अहमदनगर ते पुणे

राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) पहिली बस अहमदनगर-पुणे मार्गावर 1 जून 1948 ला धावली होती. त्याची आठवण म्हणून हा दिवस एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो; मात्र यंदापासून तो परिवहन दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
2. डॉ . गिरिधर गमांग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे ते अलीकडे चर्चेत होते. डॉ. गमांग हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत ?

A. आसाम
B. छत्तीसगड
C. ओडिशा
D. झारखंड


Click for answer

C. ओडिशा

प्रसिद्ध आदिवासी नेते, ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि तब्बल नऊ वेळेस खासदारकी भूषविणाऱ्या डॉ. गिरिधर गमांग यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकला. गमांग हे तब्बल नऊवेळेस कोरपूट मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
3. केंद्राच्या कॅबिनेट सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

A. प्रदीपकुमार सिन्हा
B. अजित सेठ
C. सौरभ कुमार
D. माणिक सरकार


Click for answer

A. प्रदीपकुमार सिन्हा

उत्तर प्रदेशचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार सिन्हा यांची कॅबिनेट सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. सध्याचे कॅबिनेट सचिव अजित सेठ हे निवृत्त होत असून, सिन्हा हे 13 जूनपासून पदभार सांभाळतील.
सिन्हा हे 1977 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पदभार स्वीकारेपर्यंत सिन्हा यांची कॅबिनेट सचिवालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासही मोदी यांनी मान्यता दिली आहे. सिन्हा यांच्याकडे जुलै 2013 पासून ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी आहे.
4. अलिकडेच कोणत्या राज्य सरकारने सार्वजनिक वाहनांमध्ये जीपीएस (GPS) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. महाराष्ट्र
B. गोवा
C. दिल्ली
D. गुजरात


Click for answer

C. दिल्ली

अलिकडेच दिल्लीच्या वाहतूक विभागाने सर्व वाहनांच्या योग्यतेच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे आवश्‍यक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये जीपीएस अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयाची 1 जून पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. "एक जून नंतर कोणत्याही व्यावसायिक किंवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा असल्याशिवाय योग्यतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही'.

सार्वजनिक वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली इंटिग्रेटेड मल्टि-मोडल ट्रान्सिट सिस्टीम्स्‌ लि. (डीआयएमटीएस) यांच्याकडून जीपीएस खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच परवडणाऱ्या दरात जीपीएस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डीआयएमटीएस जीपीएसद्वारे मिळालेल्या माहितीवर नियंत्रण ठेवणार आहे.
5. मे 2015 मध्ये कोणत्या राज्याने 18 वर्षानंतर सैन्य विशेषाधिकार कायदा (AFSA) हटविण्याचा निर्णय घेतला ?

A. जम्मू व काश्मीर
B. मणिपूर
C. आसाम
D. त्रिपुरा


Click for answer

D. त्रिपुरा

त्रिपुरा सरकारने राज्यातून सुमारे 18 वर्षांनंतर सैन्य विशेषाधिकार कायदा (अफ्सा) हटविण्याचा निर्णय घेतला. त्रिपुरातील बंडाळी मोडून काढण्यासाठी गेल्या अठरा वर्षांपासून याठिकाणी लागू असलेला ‘अफ्सा‘ हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने ‘अफ्सा‘ हटविण्याचा निर्णय घेतला.
त्रिपुरामध्ये हिंसक घटनांमुळे 16 फेब्रुवारी 1997 मध्ये ‘अफ्सा‘ लागू करण्यात आला होता.
6. डी डी किसान या 24 तास कृषीविषयक वाहिनीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केव्हा करण्यात आले ?

A. 11 मे 2015
B. 26 मे 2015
C. 31 मे 2015
D. 2 जून 2015


Click for answer

B. 26 मे 2015

त्यामुळे ऑपरेटर्संना ही वाहिनी ग्राहकांना उपलब्ध करून देणे अनिवार्य असेल. सध्या 25 विविध वाहिन्यांचा "मस्ट कॅरी‘ श्रेणीमध्ये समावेश आहे.
7. यदवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांचा नुकताच कोणत्या भूतपूर्व संस्थानाचे उत्तराधिकारी म्हणून राज्याभिषेक झाला ?

A. त्रिवेंद्रम
B. म्हैसूर
C. तंजावर
D. अवध


Click for answer

B. म्हैसूर
8. फोर्ब्स मासिकाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या जगातील शंभर प्रभावशाली महिलांच्या यादीत अग्रस्थानी कोण आहे ?

A. हिलरी क्लिंटन
B. अँजेला मर्केल
C. इंद्रा नूयी
D. अरूंधती भट्टाचार्य


Click for answer

B. अँजेला मर्केल

‘फोर्ब्स‘ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील 100 सर्वांत प्रभावशाली महिलांमध्ये चार भारतीय महिलांचाही समावेश आहे. या यादीत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल पहिल्या स्थानावर आहेत.

फोर्ब्सने12 वी वार्षिक यादी प्रसिद्ध केली आहे. अँजेला मर्केल यांच्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या हिलरी क्लिंटन दुसऱ्या स्थानी, दानकर्त्या मेलिंडा गेट्स व फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख जॅनेट येलेन तिसऱ्या स्थानावर आहेत.

फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील शंभर प्रभावशाली महिलांची यादी जाहीर करण्यात येते. यंदा प्रसिद्ध झालेल्या यादीत भारतातील चार महिला आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधति भट्टाचार्य (30 व्या स्थानी), आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर (35 व्या स्थानी), बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार-शॉ (85 व्या स्थानी) आणि हिंदुस्तान टाईम्स माध्यम समुहाच्या अध्यक्षा शोभना भारतीया (93 व्या स्थानी) यांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या या यादीत भारतीय वंशाच्या इंदिरा नुयी (पेप्सिकोच्या अध्यक्षा) आणि पद्मश्री वॉरियर (सिस्को टेक्नॉलॉजीच्या प्रमुख) याही आहेत.
9. संसदेच्या सभापतींची जागतिक परिषद कोठे संपन्न होत आहे ?

A. न्यूयॉर्क
B. जिनिव्हा
C. नवी दिल्ली
D. सेऊल


Click for answer

B. जिनिव्हा

जीनिव्हा येथे होणाऱ्या सभापतींच्या जागतिक परिषदेसाठी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन हजर होत्या. ही बैठक एक व दोन जूनला संपन्न झाली.
10. इराणच्या राजदूतपदी नुकतीच कोणाची नेमणूक करण्यात आली ?

A. सौरभ कुमार
B. मालिनी शंकर
C. देवयानी खोब्रागडे
D. एस. जयशंकर


Click for answer

A. सौरभ कुमार

इराणच्या भारतीय राजदूतपदी सौरभ कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1989च्या तुकडीचे अधिकारी आहेत. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात संयुक्त सचिवपदी कार्यरत असून, लवकरच ते राजदूत पदाचा कार्यभार स्वीकारतील.
सविस्तर वाचा...... “चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 2 जून 2015”

Monday, June 1, 2015

GK Quiz Random Questions

आमचा एक वेगळा प्रयोग. तुम्हाला तुमची तयारी पडताळून पाहता यावी म्हणून सुरू करत आहोत.
ही प्रश्नमंजुषा दर वेळी तुम्ही सुरू कराल तेव्हा वेगळे प्रश्न Randomly निवडून देईल.
तुमची उत्तरे पडताळून पाहण्यासाठी शेवटी असलेल्या 'Check Answers' बटनाला दाबा.
नवीन प्रश्नसंच सोडवण्यासाठी खाली दिलेले 'Take Fresh Quiz' बटन दाबा.
तुम्हाला हा प्रयोग आवडला असल्यास डाव्या बाजूच्या फेसबुक लाईक ला नक्की क्लिक करा. त्यावरून आम्ही इतरही विषयांवर आधारित असे प्रश्नसंच द्यावे किंवा नाही हे ठरवू.
महत्त्वाचे म्हणजे हा प्रयोग तुम्हाला आवडला तर आम्ही येथीलही प्रश्न आणखी वाढवू, म्हणजे तुम्हाला जास्त सराव होईल.

सविस्तर वाचा...... “GK Quiz Random Questions”

Sunday, May 31, 2015

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा 31 मे 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. नुकत्याच पार पडलेल्या कान चित्रपट महोत्सवात नीरज घायवान या मराठी दिग्दर्शकाला त्याच्या कोणत्या हिंदी चित्रपटासाठी प्रतिष्ठेच्या 'फिप्रेसी' या इंटरनॅशनल ज्युरी ऑफ फिल्म क्रिटिक्स या गौरवासह दिग्दर्शक नीरजला 'अनसर्टन रिगार्ड' विभागातील 'आश्वासक दिग्दर्शक' या मानाच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले ? mpsc-current-affairs

A. रॉय
B. मसान
C. किल्ला
D. पिकू


Click for answer

B. मसान
2. आमदार कृष्णा घोडा यांचे नुकतेच दुर्दैवी निधन झाले . ते कोणत्या विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत होते ?

A. पालघर
B. अहेरी
C. डहाणू
D. गडचिरोली


Click for answer

A. पालघर
3. यापुढे कोणत्या महापुरुषाचा जन्मदिन हा राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ?

A. शाहू महाराज
B. डॉ बाबासाहेब आंबेडकर
C. पं. दिनदयाळ उपाध्याय
D. पं. ईश्वरचंद्र विद्यासागर


Click for answer

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षांनिमित्त यापुढे १४ एप्रिल 'राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वर्षभरात डॉ. आंबेडकरांच्या स्मरणार्थ नाणे व टपाल तिकिटाचे लोकार्पण करण्यात येईल.
4. इनसायडर ट्रेडिंग चे सेबीकडून आरोप झाल्यानंतर कोणत्या उद्योग समूहाचे चेअरमन असलेल्या ए.वेल्लायन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे ?

A. मुथूट
B. क्रायेक्स
C. सुमधुर
D. मुरूगप्पा


Click for answer

D. मुरूगप्पा
5. गूगल कोणती नवी संगणक प्रणाली (OS) विकसित करत आहे ?

A. ब्रिलो
B. फायरफॉक्स
C. ओपेरा
D. विंड रिव्हर


Click for answer

A. ब्रिलो
6. कोणत्या माजी टेनिसपटू ला बलात्काराच्या आरोपात अलीकडेच सहा वर्षांची कैदेची शिक्षा फर्मावली गेली आहे ?

A. बॉब हेवीट
B. आंद्रे आगासी
C. पीट सॅम्प्रास
D. मायकेल चॅन


Click for answer

A. बॉब हेवीट
7. कोणता भारतीय वंशाचा अकरा वर्षांचा अमेरिकी मुलगा वयाच्या अकराव्या वर्षी पदवी मिळवली म्हणून अलीकडेच चर्चेत होता ?

A. सागर वैद्य
B. गोकुळ वेंकटचलम
C. वन्या शिवशंकर
D. तनिष्क अब्राहम


Click for answer

D. तनिष्क अब्राहम

भारतीय वंशाच्या एका अकरा वर्षांच्या अमेरिकी मुलाने वयाच्या अकराव्या वर्षी पदवी मिळवली असून त्याने त्याच्या जोडीला गणित, विज्ञान, परराष्ट्र भाषा या इतर तीन संलग्न पदव्याही मिळवल्या आहेत.
तनिष्क अब्राहम हा मूळ कॅलिफोर्नियातील सॅक्रॅमेन्टो येथील रहिवासी असून तो अमेरिकन रिव्हर कॉलेजमधून पदवीधर झाला आहे. तेथे १८०० विद्यार्थी शिकतात. त्याने सगळे शिक्षण मात्र घरीच पूर्ण केले आहे.
8. ब्रिटनचा प्रतिष्ठेचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे ?

A. लास्लो क्रस्नाहोर्काइ
B. लिडिया डेव्हिस
C. सलमान रश्दी
D. अमिताव घोष


Click for answer

A. लास्लो क्रस्नाहोर्काइ
हंगेरीचे लेखक लास्लो क्रस्नाहोर्काइ यांना ब्रिटनचा प्रतिष्ठेचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार कादंबरीसाठी जाहीर झाला असून, त्यांनी भारताचे अमिताव घोष व इतर आठ जणांना मागे टाकले आहे.
क्राझनाहोरकाय यांची पहिली कादंबरी 'सॅटनटँगो' नावाने १९८५ मध्ये हंगेरीत प्रसिद्ध झाली, नंतर त्यावर बेला तार यांनी चित्रपटही काढला. १९८९ मध्ये त्यांनी 'द मेलानकोली ऑफ रेझिस्टन्स' ही कादंबरी लिहिली ती १९९८ मध्ये इंग्रजीत प्रसिद्ध झाली.
. मॅन बुकर पुरस्कार ६० हजार पौंडाचा असून, इंग्रजी किंवा इंग्रजीत अनुवादित पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो. कुठल्याही लेखकाला हा पुरस्कार आयुष्यात एकदाच दिला जातो.
' मॅन बुकर इंटरनॅशनल' पारितोषिक दर दोन वर्षांनी दिले जाते. हयात असलेल्या कोणत्याही देशातील लेखकाच्या इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या अथवा भाषांतरित झालेल्या साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार २००५ पासून सुरू झाला असून, त्यात लेखकाच्या एकाच कलाकृतीऐवजी सर्वागीण साहित्याचा विचार केला जातो. २०१३ साली लिडिया डेव्हिस यांना त्यांच्या अतिलघुकथा निर्मितीसाठी मॅन बुकर मिळाला होता.
9. भारताने मंगळ व चांद्र मोहिमा यशस्वी केल्यानंतर आता पुढच्या कोणत्या आंतरग्रहीय मोहिमेचा विचार सुरू केला आहे ?

A. बुध
B. शुक्र
C. शनि
D. गुरू


Click for answer

B. शुक्र

भारताने मंगळ व चांद्र मोहिमा यशस्वी केल्यानंतर आता पुढच्या आंतरग्रहीय मोहिमेचा विचार सुरू केला आहे, त्यात शुक्रावर अंतराळ यान पाठवण्याच्या योग्यतेबाबत अभ्यास करण्यासाठी यू.आर.राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
इस्रोचा अग्रक्रम काय असावा हे ठरवण्यासाठी यू.आर.राव यांची समिती नेमण्यात आली आहे. येत्या अडीच वर्षांत शुक्रावर अवकाशयान पाठवले जाण्याची शक्यता किरणकुमार यांनी व्यक्त केली आहे.
इस्रो पुढील दिशादर्शन उपग्रहांसाठी अणुघडय़ाळ तयार करीत आहे पण सध्या अणुघडय़ाळ युरोपकडून खरेदी करावे लागत आहे. अणुघडय़ाळामुळे कंप्रता व काळ अधिक अचूक मोजला जातो त्यामुळे ते आयआरएनएसएस उपग्रहांसाठी उपयुक्त आहे.
10. केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प-2015 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे 1 जून 2015 पासून सेवा कराचा दर (Service Tax) किती केला आहे ?

A. 10.40
B. 12.36
C. 14.00
D. 25.00


Click for answer

C. 14.00
सेवाकराचा दर पूर्वी 12 टक्के होता, शिक्षण अधिभारासह तो 12.36 टक्के होता. आता सुधारीत दर 14 टक्के असून शिक्षण अधिभार या नवीन दरात समाविष्ट करण्यात आले असून , ते वेगळे आकारले जाणार नाही.
सविस्तर वाचा...... “चालू घडामोडी प्रश्नमंजुषा 31 मे 2015”

Monday, May 25, 2015

Current Affairs Quiz 25 May 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी राज्य शासनाने कोणती नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे ? wash-maharashtra-govt-scheme

A. सर्च
B. वॉश
C. कायाकल्प
D. आयुष


Click for answer

B. वॉश

आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी राज्यसरकारने "वॉटर, सॅनिटेशन अँड हायजिन‘ अर्थात वॉश ही नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेसाठी आदिवासी विकास विभागाने 250 कोटी रुपयांची तरतूद केली असून, यातून विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय आणि स्वच्छतापूर्वक वातावरण निर्माण करण्याचा कार्यक्रम प्रत्येक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने 2019 पर्यंत स्वच्छ भारताचे उद्दिष्ट समोर ठेवून "स्वच्छ भारत मिशन‘ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केला. स्वच्छ भारताचे उद्दिष्ट साधण्यासाठी शाळा हे प्रभावी माध्यम आहे. यासोबतच "स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा‘ हा कार्यक्रमही सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा निर्माण करणे व त्या पुरेशा प्रमाणात सुरळीतपणे सुरू ठेवणे या बाबीवर भर देण्यात येणार आहे.

शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव करून देणे, स्वच्छतेचा प्रसार व प्रचार करणे, तसेच आरोग्य सुविधा पुरविण्याचे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. वॉश योजना टप्प्याटप्प्याने सर्व शासकीय अनुदानित आश्रमशाळा, तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये राबविण्यात येणार असून, सुरवातीला हा कार्यक्रम आदिवासी विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या सर्व आश्रमशाळांमध्ये 2015-16 या शैक्षणिक वर्षांपासून राबविण्यात येणार आहे.

योजना यशस्वी होण्यासाठी "युनिसेफ‘ या आंतरराष्ट्रीय संस्थेने राज्यसरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. युनिसेफचे सहकार्य हे मनुष्यबळ, तांत्रिक आणि आर्थिक सहयोग अशा विविध पातळीवर घेण्यात येईल.
2. महाराष्ट्र सरकार द्वारे देण्यात येणारा व्ही .शांताराम जीवनगौरव पुरस्कार यंदा __________________ यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार _________________ यांना प्रदान करण्यात आला .

A. सूर्यकांत लवंदे, शशिकला
B. सोनाली कुलकर्णीच्या, विद्या बालन
C. शशी कपूर, रेखा
D. अमिताभ बच्चन, रेखा


Click for answer

A. सूर्यकांत लवंदे, शशिकला

महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ सिनेछायाचित्रकार सूर्यकांत लवंदे यांना, तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांना जाहीर झाला. तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारसाठी सोनाली कुलकर्णीच्या आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री विद्या बालनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले
3. राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या कर्करोग कार्यक्रमाने दिलेल्या माहितीनुसार , कर्करोग हा भारतातील सर्वात प्राणघातक रोग ठरला असून, या रोगामुळे दररोज देशात किती बळी जातात असे नमूद करण्यात आले आहे ?

A. 76
B. 300
C. 1300
D. 10000


Click for answer

C. 1300

कर्करोग हा भारतातील सर्वांत मोठा प्राणघातक रोग ठरला असून, या रोगामुळे दररोज १३०० नागरिकांचा बळी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राणघातक रोगात कर्करोगानंतर टीबीचा क्रमांक आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या कर्करोग कार्यक्रमाने दिलेल्या माहितीनुसार २०१२ ते २०१४ या दोन वर्षांत कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूत सहापट वाढ झाली आहे. २०१४ साली कर्करोगामुळे देशात जवळपास ५ लाख मृत्यू झाले आहेत.
4. नवनियुक्त राज्यपाल व त्यांच्या नियुक्तींचे राज्य यांच्या योग्य जोड्या जुळवा
I. झारखंड        a. द्रौपदी मुरूमू
II. त्रिपुरा        b.तथागत रॉय 
III. अरूणाचल प्रदेश    c. जे.पी.राजखोवा 
IV. मेघालय        d. व्ही . षण्मुगन


A. I-a, II-b, III-c, IV-d
B. I-b, II-a, III-d, IV-c
C. I-d, II-b, III-c, IV-a
D. I-d, II-c, III-b, IV-a


Click for answerA. I-a, II-b, III-c, IV-d

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथागत रॉय यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर द्रौपदी मुरमू यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. झारखंडचे सध्याचे राज्यपाल सईद अहमद यांची मणिपूरला बदली करण्यात आली आहे. निर्भय शर्मा यांचीही बदली करण्यात आली असून, ते आता मिझोरामचे राज्यपाल असतील, तर मेघालयच्या राज्यपालपदी व्ही. षण्मुगन यांची नियुक्ती केली आहे.

5. भारताचे पुढील संरक्षण सचिव या पदावर अलिकडेच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. राधाकृष्ण माथूर
B. जी. मोहन कुमार
C. कानू देसाई
D. देबज्योती राय


Click for answerB. जी. मोहन कुमार

भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी जी. मोहनकुमार हे ओदिशा केडरच्या १९७९ चे अधिकारी असून सध्या संरक्षण उत्पादन विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. मोहनकुमार यांच्या नियुक्तीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने शिक्कामोर्तब केले असून त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर त्या तारखेपासून त्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल, असे संबंधित आदेशात म्हटले आहे. विद्यमान संरक्षण सचिव राधाकृष्ण माथूर यांची मुदत येत्या २८ मे रोजी संपत असून त्यांच्याकडून मोहनकुमार सूत्रे स्वीकारतील.

6. जयललिता यांनी शनिवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. त्या कितव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत ?

A. तिसऱ्यांदा
B. चौथ्यांदा
C. पाचव्यांदा
D. दुसऱ्यांदा


Click for answerC. पाचव्यांदा

7. समलिंगी संबंधांतून होणाऱ्या विवाहांना जनमताच्या माध्यमातून मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला ?

A. अमेरीका
B. फ्रान्स
C. इंग्लंड
D. आर्यलंड


Click for answerD. आर्यलंड

तब्बल साडेतीन लाख नागरिकांनी यासाठी केलेल्या मतदानात तब्बल ६२ टक्के नागरिकांनी समलैंगिक विवाहाच्या बाजूने मत नोंदविले. त्यामुळे आयरिश सरकारला समलैंगिक विवाहाला परवानगी द्यावी लागली. आयर्लंडच्या जनतेचा हा निर्णय कट्टर विचारसरणीच्या कॅथॉलिक चर्चला धक्का मानला जात आहे.

8. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कोणत्या नावाने अकाउंट सुरू करत मे 2015 पासून टि्वटर या सोशल नेटवर्कींग वेबसाईटवरुन जगाशी संपर्क सुरू केला आहे ?

A. व्हाईट हाऊस
B. अमेरीकन प्रेसिडेंट ऑफीस
C. ओबामा ऍट व्हाईट हाऊस
D. अ‍ॅट पोट्स


Click for answerD. अ‍ॅट पोट्स (@ President of the United States (POTUS))

9. महाराष्ट्र बुध्दीबळ लीगच्या (MCL) तिसऱ्या सत्रासाठी पार पडलेच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली ?

A. पद्मिनी राऊत
B. इशा करवडे
C. कोनेरू हम्पी
D. शाल्मली गागरे


Click for answerC. कोनेरू हम्पी

10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये केलेल्या फ्रान्सच्या दौऱ्या दरम्यान फ्रान्सच्या अध्यक्षांना ‘ट्री ऑफ लाईफ’ हे पेंटींग भेट दिले. हे पेटिंग कोणत्या चित्रकाराने तयार केलेले आहे ?

A. भास्कर महापात्रा
B. कैलास मेहेर
C. नीरज गुप्ता
D. एम.डी.पराशर


Click for answerA. भास्कर महापात्रा

सविस्तर वाचा...... “Current Affairs Quiz 25 May 2015”

Sunday, May 24, 2015

Job Alert: KVS total 4339 Posts

केंद्रीय विदयालय संगठन (KVS) मध्ये अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या एकूण 4339kvs पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्रता व सविस्तर जाहीरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या http://kvsangathan.nic.in/EmployementNotice.aspx वेबसाईटचा वापर करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2015

 

 

 

 

सूचना:
आम्ही ह्या ठिकाणी नोकरीविषयक विविध वृत्तपत्रे आणि ऑनलाईन स्त्रोतांमध्ये उपलब्ध असलेली माहिती उमेदवारांच्या महितीसाठी संकलित स्वरुपात देतो.
उमेदवारांनी सर्व बाबींची पडताळणी करून घेणे उचित ठरेल. आम्ही स्वत: कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारात नाहीत वा कोणत्याही एजन्सी मार्फत वा क्लासेस मार्फत कोठल्याही स्वरूपाचे मार्गदर्शन करत नाहीत.

सविस्तर वाचा...... “Job Alert: KVS total 4339 Posts”